क्षण भंगूर जीवन
ठसका लागून प्राण जातो, घशांत अडकून काही तरी । क्षणांत सारा खेळ आटपतो, धडपड केली किती जरी ।। हृदय जेव्हा बंद पडते, उसंत न मिळे एक क्षणाची । केवळ तुम्हीं चालत असतां, यात्रा संपते जीवनाची ।। कांचेचे भांडे निसटता, तुकडे त्याचे होऊन जाती । देहाचा काय भरवसा, जेव्हां सांपडे अपघाती ।। वाढ करण्या शरीराची, पडत असती […]