आमचे ध्येय व दिशा
कोठे चाललो आम्ही, जसे वाहती वारे, दिशा नसे आम्हाला, जसे फिरती भोवरे ।।१।। धावत सुटला एकसारखा, प्रत्येकाचा वेग निराळा, कोठे चाललास? विचारतां हासत राहतो बावळा ।।२।। नाही कुणा ध्येय निश्चित असे एक, परिस्थितीच्या ओघांत, वाहत चालती अनेक ।।३।। जीवन कशासाठीं कळले नाही कुणां जन्मलो म्हणून जगावे हेच वाटते सर्वांना ।।४।। तशातच तरले कांहीं उध्दरुन ही गेले […]