कृष्णकमळ
तूच माझा ईश्वर
मनांत ठसले रूप तुझे, येते नयना पुढे । रात्रंदिन मज चैन ना पडे…..।।धृ।। शरीर जरी सुंदर मिळे । प्रयत्नांनी तूंच कमविले ।। चपलता ही छाप पाडीते । लक्ष्य खेचूनी तुझ्याकडे मनी ठसविले रूप तुझे येत नयना पुढे ।१। हासणे खेळणें आणि चालणें । ‘ढंगदार’ तुझे बोलणे ।। शरीरामधल्या हालचालींना । सहजपणाचे वळण पडे मनी ठसविले रूप […]
सर्व जीवांना जगूं द्या
जाळी जळमटे वाढूं लागली, घरा भोवती । किडे नि मुंग्या झुरळे, यांची रेलचेल होती ।। चिवचिव करीत चिमण्या, येती तेथे । काड्या-कचरा आणूनी, घरटी बांधत होते ।। झाडून घेई हळूवारपणे, तो कचरा । भिंती आणि माळ्यावरी ठेवी, तसाच पसारा ।। स्वातंत्र्याची मुभा होती, झुडपांना तेथे । स्वच्छंदानें अंगणी वाढती, सर्व दिशांनी ते ।। जगणे आणि जगू […]
भरताची निराशा
निराश झाले मन भरताचे, बघूनी रिक्त महाल…….।।धृ।। लागली नाही, श्रीरामाची त्याला तेथें चाहूल ।। झाली होती पितृज्ञा ती । पाठवी रामा वनीं ।। माता कैकेयीच हट्ट करिते । दूजे नव्हते कुणी ।। कुणास दाखवी राग मग तो, लोचनी आले जल….१, निराश झाले मन भरताचे, बघूनी रिक्त महाल ।। उंचबळूनी हृदय भरता । कंठी दाटला […]
नाम मार्ग
ईश्वर आहे नामांत परि, नाम कुणाचे घेता? विठ्ठल हरि पांडूरंग वा अल्ला येशू असतां ।। असंख्य त्याची नामे असतां एकच आहे भगवान । कांहीही म्हणता येईल तो, त्याची करीतां आठवण ।। आठवणीतच तो लपला आहे, दिसत नाही कुणा । रुप कुठलेही स्मरा, दिसेल तुमच्या नयना ।। रंग रूप आणि आकार देणे, असते सोई साठी । एकाग्र […]
नामस्मरणाचे कोडे
मनी वाटते नाम तुझे, सदैव मुखी यावे, कर्तव्या माजी एकाग्र असतां, कसे बरे हे व्हावे ? कोडे हे उकलून घ्यावे……।। धृ ।। श्वास चालतो रात्रदिनीं, लक्ष्य न घेई खेचूनी, ऊर्जा मिळते देहातूनी, परि मनास बंधन नसावे….१, कोडे हे उकलून घ्यावे एकचि कार्य एके क्षणी, एकाग्रता येई दिसूनी, अवसर मिळे मग कोठूनी, त्याच घडीला कसे नाम घ्यावे……२, […]
जादूगार तूं देवा
जादूगार तूं देवा, दाखवी चमत्कार आठवण येण्या तुझी, करितो हाः हाः कार ।।धृ।। ढग काळे काळे जमवितोस सगळे गर्जती वादळे कडाडूनी विजा, पर्जन्य होई भयंकर ।।१।। जादूगार तूं देवा, दाखवी चमत्कार आठवण येण्या तुझी, करितो हाः हाः कार तळपते ऊन दग्ध होई जीवन जाई वाळून तेज वाढूनी सूर्याचे, दाह करी फार ।।२।। जादूगार तूं देवा, दाखवी […]
भरताचा जाब
ज्याच्यासाठीं व्याकूळ झाली, उभी अयोध्या नगरी, कां धाडिला राम वनीं ? कैकयीला भरत विचारी ।।धृ।। आम्ही बंधू चौघेजण, झालो एका पिंडातून, कसा येईल भाव परका ? असतां एकची जीव, चार शरीरीं कैकयीला भरत विचारी ।।१।। वचनपूर्ती ब्रीद ज्याचे, आदर्श जीवन रघूवंशाचे, कसली शंका मनांत होती ? पारख ना केलीस, त्या हिऱ्याची परी, कैकयीला भरत विचारी ।।२।। […]