देह ईश्वरी रूप
स्नान करूनी निर्मळ मनीं, दर्पणापुढे येऊन बसला । जटा साऱ्या एकत्र बांधूनी, भस्म लाविले सर्वांगाला ।। ओंकाराचा शब्द कोरला, चंदन लावूनी भाळावरती । रूद्राक्षाच्या माळा बांधल्या, गळा हात नि शिरावरती ।। वेळेचे भान विसरूनी, तन्मय झाला रूप रंगविण्या । प्रभू नाम घेत मुखानें, नयन आतूर छबी टिपण्यां ।। पवित्र आणि मंगलमय, वाटत होते स्वरूप बघूनी । […]