जीवनाचा खरा आनंद
केव्हां मिळेल मजला आनंद जीवनाचा ।।धृ।। बालपणाची रम्यता मजा केली खेळ खेळता निरोप देता बालपणाला नाद गेला खेळण्याचा ।।१।। केव्हां मिळेल मजला आनंद जीवनाचा तारुण्याचे सुख आगळे मादकतेने शरिर भारले बहर ओसरु लागला दूर सारतां घट प्रेमाचा ।।२।। केव्हां मिळेल मजला आनंद जीवनाचा प्रौढत्वाची शानच न्यारी श्रेष्ठतेची ठरे भरारी येतां दुबळेपणा शरिराला उबग येई संसाराचा ।।३।। […]