नवीन लेखन...

सर्व जीवांना जगूं द्या

जाळी जळमटे वाढूं लागली, घरा भोवती  । किडे नि मुंग्या झुरळे,  यांची रेलचेल होती  ।। चिवचिव करीत चिमण्या,  येती तेथे  । काड्या-कचरा आणूनी,  घरटी बांधत होते  ।। झाडून  घेई हळूवारपणे, तो कचरा  । भिंती आणि माळ्यावरी ठेवी,  तसाच पसारा  ।। स्वातंत्र्याची मुभा होती,  झुडपांना तेथे  । स्वच्छंदानें अंगणी वाढती,  सर्व दिशांनी ते  ।। जगणे आणि जगू […]

भरताची निराशा

निराश झाले मन भरताचे, बघूनी रिक्त महाल…….।।धृ।। लागली नाही, श्रीरामाची त्याला तेथें चाहूल  ।। झाली होती पितृज्ञा ती  । पाठवी रामा वनीं  ।। माता कैकेयीच हट्ट करिते  । दूजे नव्हते कुणी  ।। कुणास दाखवी राग मग तो, लोचनी आले जल….१, निराश झाले मन भरताचे, बघूनी रिक्त महाल  ।।   उंचबळूनी हृदय भरता  । कंठी दाटला सारे  […]

खेचून मिळवा

तो तर देत नसतो कांहीं, घ्यावे लागते खेचूनी  । शक्ती लावूनी खेचा सारे, देईल परि ढील सोडूनी  ।।१।। जरी असला दयेचा सागर, केवळ मागणें मान्य नसे  । तुटून तुमचे प्रयत्न होता, ओजळीने तो देत दिसे  ।।२।। व्यर्थ घालवी जीवन कांही, स्वार्थीपणाच्या मागणी पायी  । वेडे ठराल तुम्हींच परि, काळ मात्र कधी थांबत नाही  ।।३।। धडपड करा, […]

निती मूल्ये विसरला

विसरलास तू मानव पुत्रा, नीतिमूल्ये सगळी, काय दुर्दशा झाली तुझी, काय दुर्दशा झाली….।। धृ ।। स्वप्नामध्ये दिले वचन, पाळीले ते राज्य घालवून, हरिश्चद्रांची कथा आजही करीते मान ताठ आपुली….१, विसरला तू मानव पुत्रा  नीतिमूल्ये सगळी, राजा साठी देई प्राण, दुजासाठी होते जीवन, ‘सिंहगड’ तो घेई जिंकूनी शिवरायाची शान राखली….२, विसरलास तू मानव पुत्रा नीतिमूल्ये सगळी, काळ […]

नाम मार्ग

ईश्वर आहे नामांत परि, नाम कुणाचे घेता? विठ्ठल हरि पांडूरंग वा अल्ला येशू असतां   ।।१।।   असंख्य त्याची नामे असतां एकच आहे भगवान  । कांहीही म्हणता येईल तो, त्याची करीतां आठवण  ।।२।।   आठवणीतच तो लपला आहे, दिसत नाही कुणा  । रुप कुठलेही स्मरा, दिसेल तुमच्या नयना  ।।३।।   रंग रूप आणि आकार देणे, असते सोई […]

नामस्मरणाचे कोडे

मनी वाटते नाम तुझे, सदैव मुखी यावे, कर्तव्या माजी एकाग्र असतां, कसे बरे हे व्हावे ? कोडे हे उकलून घ्यावे……।। धृ ।। श्वास चालतो रात्रदिनीं, लक्ष्य न  घेई खेचूनी, ऊर्जा मिळते देहातूनी, परि मनास बंधन नसावे….१, कोडे हे उकलून घ्यावे एकचि कार्य एके क्षणी, एकाग्रता येई दिसूनी, अवसर मिळे मग कोठूनी, त्याच घडीला कसे नाम घ्यावे……२, […]

रामाची व्याकूळता

सीतेकरीता व्याकुळ झाला अवतारी चक्रपाणी, अजब ही रामप्रभू कहाणी  ।।धृ।।   पत्नीहट्ट त्याला सांगे, कांचनमृग शोभेल अंगे, मृगयेच्या तो गेला मागे प्रसंग घेई रावण साधूनी  ।।१।। अजब ही रामप्रभू कहाणी   रावण नेई पळवूनी सीता दिसेना रामा कोठे आता तरुवेलींना पुसत होता वाहत होते अश्रू नयनीं   ।।२।। अजब ही रामप्रभू कहाणी   वाणी ज्याच्या शक्ती शिवाची […]

कोण ती स्फूर्ती देवता ?

मजला नव्हते ज्ञान कशाचे, पद्यामधल्या काव्य रसाचे  । कोठून येते सारी शक्ती, काव्य रचना करूनी जाती  ।।१।।   अवचितपणे विचार येतो, भावनेशी सांगड घालीतो  । शब्दांचे बंधन पडूनी, पद्यरूप जातो देऊनी  ।।२।।   सतत वाटते शंका मनी, हे न माझे, परि येई कोठूनी  । असेल कुणी महान विभूती, माझे कडूनी करवून घेती  ।।३।।   तळमळ आता […]

देवाचिया दारीं

देवाचिया दारीं, मनाचा मुजरा, झुकवूनिया मान, हासे तो चेहरा ।। धृ ।। जाई जेव्हां मंदिरी, घेतां प्रभू दर्शन, आनंदानें नाचते, हर्षित चंचल मन, नयन साठविती, त्या मंगल ईश्वरा, देवाचिया दारी मनाचा मुजरा  ।।१।। नदीनाले धबधबा, उंच उंच वृक्ष वेली, कोकीळ गाती, मोर नाचे, इंद्रधनुष्याच्या खाली, रोम रोमातूनी शिरे, निसर्गाचा फवारा, देवाचिया दारी मनाचा मुजरा  ।।२।। दु:खी […]

झगडणारे जीवन

गर्भामधूनी बाहेर पडतां, स्वतंत्र जीवन मिळे  । जीवन रस हा शोषित होती, आजवरी त्याची मुळे  ।।१।।   निघून गेला पदर मायेचा, डोईवरूनी त्याचा  । झेप घेयी तो आज एकला, पोकळीत नभाच्या  ।।२।। दु:ख क्लेशाचे वार झेलले, कुणीतरी त्याचेसाठीं  । आज दुवा नसता सारे पडती पाठी  ।।३।। तेच रक्त परि फिरत होते, शरीरी त्याच्या सारे  । वंशाने […]

1 6 7 8 9 10 14
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..