श्रीगुरुस्तवन
ज्ञानदेव म्हणतात की सद्गुरु हा कृपामयी आहे. कैवल्याचे सोने प्रत्येकाच्या पदरात टाकणारा विश्वउदार आहे. तो विचारश्रीमंत आहे. आचारश्रीमंत आहे. तो विवेक श्रीमंतही आहे. इतकेच नव्हे तर सद्गुरु हा खरा सामर्थ्यवान आहे. सद्गुरु हा इतका सामर्थ्यवान आहे की प्रत्येक शिवाचेही सामर्थ्य तो आपल्या केवळ कैवल्य-अस्तित्वाने जिंकून घेतो. कारण एक गोष्ट इथे लक्षात घेण्यासारखी आहे ती ही की शिव हा निराकारात स्थिर आहे. त्याचे सामर्थ्य हे त्याच्या भक्तांच्या सामर्थ्याच्या तुलनेतच त्या भक्ताकडून तोलले जाते. परंतु सद्गुरुचे सामर्थ्य दृश्य आहे आणि ते काही शिष्यांच्या सामर्थ्यदृष्टीकोनातून कधी तोलले जात नाही तर तो स्वयंभू सामर्थ्यवान आहे. […]