उद्यान एक्सप्रेसचा थरार
इकडे स्टेशन मास्तरांच्या एव्हाना ही घटना दृष्टीस पडली होती. त्यांनी स्वप्नील कडे नजर टाकली आणि शुभांगी च्या दिशेने हात करत बोलले,” स्वप्नील, तिकडे बघ, कोणीतरी लहान मुलगा ट्रॅक वर पडला आहे.” स्वप्नील ने तिकडे बघितले आणि तो एकदम बेभान झाला. काय करावे हा तो विचार करत होता तेवढ्यात स्टेशन मास्तरांनी आपल्या हातातील लाल झेंडा उंच उभारून उद्यान एक्स्प्रेस च्या लोकोपायलट ला धोक्याचा इशारा दिला होता. […]