नवीन लेखन...

डिजिटल कॅमेरा

पूर्वीच्या कॅमेऱ्यात जशी फिल्म असायची तशी डिजिटल कॅमेऱ्यात नसते. यात प्रतिमा साठवण्यासाठी मेमरी डिव्हाइस असते. या कॅमेऱ्याचा फायदा म्हणजे रोल टाकण्याचा खर्च नसतो व हवी ती छायाचित्रे ठेवून बाकीची काढून टाकता येतात. पर्सनल डिजिटल असिस्टंट, मोबाईल फोन यांच्यात डिजिटल कॅमेरे असतात. […]

रिमोट कंट्रोल

ज्या एका हातात मावण्यासारख्या यंत्राच्या मदतीने आपण कुठलेही इलेक्ट्रॉनिक उपकरण लांबूनच नियंत्रित करू शकतो, त्याला रिमोट कंट्रोल म्हणतात. टी.व्ही., मोबाईल फोन, मोटार, व्हिडिओ कॅमेरा, लॅपटॉप, मायक्रोवेव्ह ओव्हन अशा असंख्य साधनांचे नियंत्रण या पद्धतीने करता येते. टीव्हीचा रिमोट कुणाच्या हातात असावा यावरून तर भांडणेही होतात. थोडक्यात, हे साधन छोटे असले तरी त्याच्या अंगी नाना कळा आहेत. […]

आइस्क्रीम मशीन

आइस्क्रीम खायला सर्वांनाच आवडते. आजकाल आइस्क्रीम विकत आणण्यावरच भर असल्याने ते घरी केले जात नाही. फार तर फ्रीजच्या फ्रीजरमध्ये दूध व पावडर टाकून काही लोक आइस्क्रीम बनवतात पण त्याला हवी तशी चव नसते. […]

सेफ्टी रेझर

रेझरचा वापर अगदी पुरातन काळापासून केला जात होता पण ते फारसे प्रगत नव्हते. इतिहासपूर्व काळात शार्कचे दात, शंख व फ्लिंट यांचा उपयोग रेझरसारखा केला जात असे. इजिप्तमधील उत्खननात सोने व तांब्याचे रेझर सापडले होते. रोममध्ये अगदी पुरातन काळात ल्युसियस तरक्विनस प्रिस्कस या राजाने पहिल्यांदा रेझरचा वापर मोठ्या प्रमाणात केला. […]

बहुपयोगी सोलर पंप

आजच्या काळात वीज भारनियमन ही फार गंभीर समस्या बनत चालली आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत पर्यायी ऊर्जास्रोत म्हणून सौरऊर्जेकडे बघितले जाते. सौरऊर्जेत सुरुवातीला जरी गुंतवणूक जास्त वाटत असली तरी नंतर ती दामदुपटीने 31 वसूल होते. सौरऊर्जेवर चालणारे असेच एक साधन म्हणजे सोलर पंप. […]

गॅस आणि इलेक्ट्रिक वॉटर हीटर

१८६८ मध्ये लंडन येथे बेंजामिन वॅडी या पेंटरने पहिल्यांदा वॉटर हीटर तयार केला, त्याला गिझर असे नाव होते. त्यामुळे आजही आपण गिझर हा शब्द वॉटर हीटरला नेहमी वापरतो. १८८९ मध्ये एडविन रूड या नॉर्वेच्या इंजिनियरने अधिक प्रगत असा इलेक्ट्रीक वॉटर हीटर तयार केला. […]

वॉटर हीटर (सोलर)

भारत हा उष्णकटिबंधातील देश असल्याने आपल्याकडे पावसाळ्याचे चार महिने सोडले तर बाकीचे दिवस सूर्यप्रकाश असतो. सहस्ररश्मी सूर्याची फुकट मिळणारी ऊर्जा वापरणे हा खरेतर इंधन टंचाईवरचा एक पर्याय आहे. पाणी तापवण्यासाठी आपण घरातील किमान २५ टक्के ऊर्जा खर्च करीत असतो ती वाचवता आली तर विजेचा किंवा गॅसचा वापर टाळल्याने प्रदूषण होणार नाही. […]

ग्लुकोज मीटर

मधुमेह हा आजार दिवसेंदिवस वाढतो आहे. विशेष म्हणजे तरुण पिढीतही त्याचे प्रमाण जास्त आहे. मधुमेहात रक्तातील साखर वाढते त्यामुळे रुग्णाला असंख्य समस्यांना तोंड द्यावे लागते. रक्तातील ही साखर नेमकी किती आहे हे मोजण्यासाठी जे वैद्यकीय उपकरण वापरले जाते त्याला ग्लुकोज मीटर असे म्हणतात. […]

कॉर्डलेस फोन

कॉर्डलेस फोन हा वापरण्यास अगदी सोपा असतो. रिसिव्हरच आपल्याजवळ असल्याने चटकन योग्य तो संदेश दोन व्यक्तींमध्ये पोहोचवता येतो. यात वायरींचे जंजाळ नसते हे त्याचे वैशिष्ट्य. काही कंपन्यांमध्ये अजूनही अंतर्गत संदेशवहनासाठी अशा प्रकारचे कॉर्डलेस फोन वापरले जातात. […]

गणकयंत्र

आजच्या संगणकाच्या युगातही आकडेमोडीसाठी कॅलक्युलेटर हे साधन वापरले जातेच. आता संगणकावर, घड्याळात, मोबाइलमध्ये कॅलक्युलेटर आहे. लॅटिनमधील कॅलक्युलेअर म्हणजे दगडांच्या मदतीने मोजणी, यावरून कॅलक्युलेटर शब्द तयार झाला. पूर्वीच्या काळी आपल्याकडे अर्ध्या भागात रंगीत मणी लावलेली पाटी होती, तिच्यात जी खुबी होती त्याचाच वापर करीत गणनाची संकल्पना प्रगत झाली. […]

1 2 3 4
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..