नवीन लेखन...

वाट

मला राज रस्त्यावरुन चालता येत नाही कारण ती शान मला पेलवत नाही | मला हम रस्त्यावरुन चालता येत नाही कारण सुखदु:खाच्या गर्दीतून वाट काढता येत नाही | मला आड वाटेंने चालता येत नाही कारण त्याचा तोकडेपणा मला झेपत नाही | मला वळणा-वळणाने चालता येत नाही कारण भोवळ येऊन मला मार्ग दिसत नाही | मला काट्याकुट्या पायवाटेंनं […]

तवा

या तव्यावरची भाकरी नाही निर्लेपला ऐकायची | कारण सरावलेल्या हातांनी तीला सवय होती फिरायची ||१|| ठरावीक ठिकाणी दाबल्यावर ती टच्च अशी फुगायची | दोनच चिमटीत धरुन अलगतशी तुटायची ||२|| तशीच जीवनाची भाकरी बाई तीला लेपनाची गरज नाही | कुठे फुगायचे कुठे ओसरायचे हे तिच्यावर अवलंबून नाही ||३|| सराईत हात दिसणार नाहीत चिमटीतून कधी सुटणार नाहीत | […]

अन्नपूर्णा

अन्नपूर्णा दारातून म्हणाली भाकरी दे माई | मी म्हणाले भाकरी नाही ब्रेड देवू कां बाई ||१|| ती म्हणाली भाकरीची चव ब्रेडला येणार नाही | मला मात्र भाकरी करायला वेळच नाही ||२|| एन्जॉयमेंट मधून मला खरं सवडच नाही | ब्रेडपेक्षा भाकरी मला परवडत नाही ||३|| रागावू नकोस तू जा पुढच्या दारी हीच रीत बघशील तू सध्या घरोघरी […]

आई

आईबरोबर भांडल्याशिवाय मला चैन नाही पडायची आणि तिच्या कुशीशिवाय मला निज नाही यायची ||१|| कारण मी होते मुलगी आणि ती होती आई मी चांगली घडावे म्हणून तीची सारखी घाई ||२|| आता मी झाले आई तेव्हा कळून चुकलं सारं आई म्हणजे झूळूक होती नव्हतं नुस्त वारं ||३|| आईबरोबर भांडायला मला मुळी आवडत नाही पण तीची कुस मला […]

चंदाराणी

१९४७ साली एक बालक जन्माला आले माय-पित्यांनी त्याचे नाव चंदाराणी ठेवले त्याच वेळी मी बिगर राज्याची राणी झाले नेहमीच विजय तर कधीतरी हार झाली आणि त्या हारेलाच एक वेगळी धार आली आयुष्याच्या सुखदु:खांशी मर्दानीपने लढली संकटाच्या सार्‍या थव्यांनी आता माघार घेतली स्त्री म्हणून सारे चटके मी एकटीनेच घेतले या सार्‍या चोथ्याचे राज्य माझे असेच उभे राहिले […]

1 2
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..