समाजमाध्यमांचा विधायक वापर
या सगळ्यात आपल्या भावना आणि विचार एकमेकांशी संभाषण साधून व्यक्त करण्याचे वरदान मानवाला लाभले आहे. पूर्वीच्या काळापासून आपण संदेशवहनासाठी वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करीत आलो आहोत या मागे एकच उद्दिष्ट की, आपल्या मनातल्या भावना व्यक्त करणे तसेच आपले विचार मांडणे. अगदी पूर्वीच्या काळी जलद गतीने संदेश पाठवण्यासाठी तार यंत्रणा अस्तित्वात होती. तसेच पोस्टमनद्वारे येणाऱ्या आपल्या मित्रांच्या-नातेवाईकांच्या पत्राची अनामिक ओढ होती. […]