ध्वनी-वेगापेक्षा अधिक वेगाने उडणारी पहिली महिला वैमानिक आणि ‘वास्प’ची निर्माती जॅकी कॉकरन
अमेरिकेच्या लष्कराच्या इतिहासात दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पश्चिम टेक्सास शहराच्या मध्यभागी एक विलक्षण लष्करी जागतिक स्वरूपाचा प्रयोगच झाला होता. टेक्सासमधील जगातील पहिल्याच ठरलेल्या केवळ स्त्री वैमानिकांच्या असलेल्या लष्करी तळावर संपूर्ण अमेरिकेतून हजारो स्त्रियांनी त्या महिला वैमानिकांच्या गटाला ‘वुमन एअर फोर्स सर्व्हिस पायलटस्’ म्हणजेच ‘वास्प’ असे संबोधले जात होते. […]