सं-सा-र त्रिसूत्री
बऱ्याच कुटुंबातून सध्या, गृहकलह वाढत असल्याचे जाणवले. दोन पिढयांमधला संवाद संपत चालल्या मुळे त्यांच्यातील समन्वय देखील हरवत चाललेला दिसतो आहे. त्यामुळे विवाहित तरुणाई / प्रौढ मंडळी मानसिक तणावाखाली असल्याचे जाणवले.
कौटुंबिक कलह म्हटल्यावर बऱ्याचदा स्त्रियांनाच विशेषतः सुनांना जबाबदार धरले जाते, परंतु यामध्ये ज्येष्ठ सदस्य आणि कर्त्या पुरुषांची भूमिका देखील तितकीच महत्वाची असते. […]