दक्षिण आफ्रिकेत एक प्राणी संग्रहालय बघण्यात आले. निरनिराळ्या प्राण्यांची वेगवेगळी दालने बघितली. एकप्रचंड असे सर्पाचे दालन होते. अति विशाल हौद, तळामध्ये दोन भाग केलेले. पाणी व जमिनिसाठ्यी. लहान मोठी झाडे, दगडाच्या शीला, काही ठिकाणी कृत्रिम वारुळे, आणि निरनिराळे खांब रोवले होते. अनेक जातीचे सर्प, पाणी व जमिनीवर मुक्त हालचाली करताना दिसत होते. अश्च्यर्याची गोष्ट म्हणजे त्या पाण्यात खूप मासे सोडलेले होते, तसेच बऱ्याच संखेने बेडूक देखील होते. दोन्हीही सापांचे खाद्य. परंतु त्यांचीही प्रजनन क्रिया देखील वाढत राहावी, ह्याचेपण वातावरण आयोजकांनी व प्रशासनांनी निर्माण केलेले होते. गंमत वाटलीकी साप व त्याचे खाद्य बेडूक व मासे एकाच वातावरणात जीवन कंठीत होते. ज्याप्रमाणे आम्ही जंगलात वाघ सिंह आणि त्याच वेळी हरीण झेब्रे ह्यांचेही कळप हे ही बघितले. जीवन मरणाचा आनंद व संघर्ष यांची कला निसर्ग शिकवतच असतो. वेटोळे घालून शांत पडलेले वा हालचाली करणारे अनेक सर्प, दिसत होते. आश्च्यर्याची गोष्ट म्हणजे कित्येक बेडूक हे तेथील सापावरही आरूढ होऊन बसलेले […]