गायीचे प्रेम
रस्त्याच्या वळणावर एका झाडाखाली एक गाय शांत उभी होती. फक्त मानेची व शेपटीची हालचाल अधून मधून चालू होती. कितीतरी वेळ ती तशीच उभी होती. जाणारा येणारा तिच्या कपाळाला, शिंगाला व अंगाला हात लावून तिला नमस्कार करू बघत होता. डोळे मिटून शांत विश्रांती घेत असालेल्या त्या गायीला, प्रत्येकाचा स्पर्श होत असल्याची जाणीव, तिच्या किंचितशा हालचालीवरून दिसून येत होती. तिला त्यांच्या स्पर्शाबद्दल काय वाटत असावे, हे समजण्यास मार्ग नव्हाता. परंतु प्रत्येक वाटसरूला तिला स्पर्श करून, जणू तेहतीस कोटी देवांचे दर्शन घेतल्याचा आनंद झाल्याचे दिसून येत होते. तेहतीस कोटी […]