नवीन लेखन...

डभईची लढाई (भाग पाच)

डभईच्या युद्धाला कारणीभूत झालेल्या मराठेशाहीतील अपप्रवृत्ती पुढील काळात कमी झाल्या नाहीत, त्या तशाच राहिल्या; आणि त्याचा अनर्थकारी परिणाम ३० वर्षांनी पानिपतावर दिसून आला. […]

डभईची लढाई (भाग चार)

युद्ध अटीतटीचें झालें. बाजीरावानें जातीनें घोड्यावरून युद्ध केलें, तर त्रिंबकरावानें हत्तीवरून लढाई केली. सूर्योदयापासून तिसऱ्या प्रहरापर्यंत मोठ्या शिकस्तीने त्रिंबकराव लढला. हत्तीवरचा माहूत पडल्यावर, पायानें हत्ती चालवून त्यानें तिरंदाजी केली. तिरंदाजी करतां करतां त्याच्या बोटाची सालें गेली. पेशव्याकडचे पुष्कळ सैनिक त्यानें मारले. […]

डभईची लढाई (भाग तीन)

सरबुलंदखानाने केलेला तह कंठाजीचा त्रास तात्पुरता मिटवण्यासाठी होता. पण त्यायोगानें पेशवे-दाभाडे कलह वाढत गेला. सेनापतीस गुजरातच्या मुलुखगिरीची ब बाजीराव पेशव्यास माळव्याच्या मुलुखगिरीची, अशी वाटणी शाहूनें केलेली होती. परंतु बाजीरावानें सेनापतीला कळवलें की, ‘गुजरातेतील निम्मे महाल (स्थानें/इलाखे) तुम्ही आम्हांकडे द्यावे, व माळव्यातले महाल आम्ही सर करू त्यातले निम्मे तुम्ही घ्यावे’. […]

डभईची लढाई (भाग दोन)

बाळाजी विश्वनाथाचा उल्लेख आधी झालेलाच आहे. १६८९ च्या सुमारास तो घाटावर आला. राजारामाच्या कारकीर्दीत तो पुण्याचा सरसुभेदारीवर होता. १७०७ च्या खेडच्या लढाईच्या वेळी तो धनाजी जाधवाच्या पदरी अंमलदार होता. त्यावेळच्या कारस्थानातील बाळाजीच्या सहभागामुळे शाहूची मर्जी त्याच्यावर बसली. […]

डभईची लढाई (भाग एक)

बडोद्याच्या इतिहासात डभोईच्या युद्धाला एक खास महत्व आहे. हें युद्ध इ.स. १ एप्रिल १७३१ ला, म्हणजे २८० वर्षांपूर्वी लढलें गेलें. बडोद्याच्या ५०० वर्षांच्या कालखंडाच्या साधारण मध्यावरील हें युद्ध आहे. […]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..