आली दिवाळी – धनत्रयोदशी
आज धनत्रयोदशी. पारंपारीक दिवाळीचा दुसरा दिवस. धनाची पूजा करण्याचा हा दिवस. दसऱ्याच्या मुहूर्तावर सुरू झालेला कापणीचा हंगाम ओसरत आलेला असतो. शेतकऱ्याच्या खळ्यात धान्याच्या राशी लागलेल्या असतात. शेतकयांच्या नजरेतून खळ्यातल्या धान्याच्या राशी हेच त्यांचे धन..! ‘धान्य’ या शब्दातूनच ‘धन’ शब्दाचा जन्म झाला असावा, उगाच नाही ‘धन-धान्य’ हा जोडशब्द तयार झाला. आणि आज पैसा जे विनिमयाचं काम करतो, तेच काम पूर्वी ‘धान्य’ करायचं. म्हणजे बार्टर एक्स्चेंजच्या काळात धान्य हे महत्वाचं धन असायचं. […]