नवीन लेखन...

देवपूजेतील साधन – फुले

देवाच्या मुर्तीत प्राणप्रतिष्ठेच्या रुपाने मंत्रशक्तीचा वास असतो. यासाठी देवाच्या मस्तकावर वासाची फुले वाहिली जातात. मंत्रशक्तीचे उत्सर्जन त्या फुलांतून होत असते. देवांना फुले अतिशय प्रिय असतात. गणेशाला तांबडे फूल, शिवाला पांढरे फुल, विष्णूला पिवळे फूल आणि ब्रम्हाला कमळाचे फूल वाहण्याचा प्रघात आहे. फुलांचे हार करुन ते देवांच्या तसेच संत, महंत व विद्वानांचा गौरव करण्यासाठी त्यांच्या गळ्यात घातले […]

देवपूजेतील साधन – अक्षता

सर्व धान्यामध्ये तांदुळाला महत्त्वाचे स्थान असून तांदुळापासून केलेला भात हे उदर भरणाचे साधन आहे. क्षत म्हणजे भोक पडणे. ज्या धान्याला भोक पडत नाही ते धान्य म्हणजे तांदूळ असून त्याला अक्षता म्हटले जाते. पूजेच्यावेळी देवांवर आणि लग्नप्रसंगी वधूवरांवर कुंकूमिश्रित अक्षता टाकल्या जातात. याचे कारण असे की देवाने आपल्यावर कृपा करावी व वधूवरांचे जीवन सुखी व्हावे हा त्यामागील […]

देवपूजेतील साधन – पानसुपारी

देवपूजेचे वेळी देवापुढे नागवेलीची पाने व त्याच्यावर सुपारी ठेवण्याचा कुलाचार आहे. लग्न, मुंज आदी मंगलकार्यप्रसंगी देखील अतिथींना पान सुपारी देण्याची प्रथा आहे. नागवेलीच्या पानांना विड्याची पाने व पोफळी झाडाच्या फळाला सुपारी म्हणतात. देठासहित असलेले विड्याचे पान आपल्या हृदयाचे प्रतीक म्हणून समजले जाते. हे पान हिरवेगार असून मनाला अल्हाद देणारे असते. विड्याच्या पानाला त्यात सुपारी व कात […]

देवपूजेतील साधन – ताम्हण

देवपूजा करण्यापूर्वी देवांना स्नान घालण्यासाठी तांबे किंवा पितळेचे जे पसरट भांडे वापरले जाते त्याला ताम्हण असे म्हणतात. ताम्हणाचा आकार गोल असल्यामुळे ते पृथ्वीचे प्रतीक समजले जाते. संध्येसाठी देखील ताम्हणाचा उपयोग केला जातो. कारण संध्या ही सुर्याची उपासना असून जी आचमने केली जातात त्याध्ये दैवी शक्ती निर्माण झालेली असते. ताम्हणात पडलेले शक्तिशाली जल पायदळी तुडवले जाऊ नये […]

देवपूजेतील साधन – तीर्थ प्रसाद

देवाला नैवेद्य दाखविल्यानंतर साखरफुटाणे, पेढे, खोबरे, फळे आदी पदार्थ भाविकांना वाटले जातात. त्याला देवाचा प्रसाद अशी संज्ञा आहे. प्र म्हणजे पुढे, साद म्हणजे हाक मारणे. प्रसाद ग्रहणामागे देवाला `आमचे जीवन पुढे ने’ अशी सुप्तपणे मारलेली हाक असते. या प्रसादामध्ये देवाची कृपादृष्टी असल्यामुळे तो श्रध्देने खाल्ला असता समाधान प्राप्त होते. देवाला पंचामृताचे स्नान घातल्यानंतर ताम्हणात जे पंचामृताचे […]

देवपूजेतील साधन – पळी पंचपात्र

पळी पंचपात्राला देवपूजेत आणि संध्येत महत्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. पळी ही तांब्याची अथवा पितळेची असते आणि तिच्या एका बाजूला छोटी वाटी व दुसर्‍या बाजूला नागफणी असते. नागफणी हे मांगल्याचे प्रतीक असून संध्या करताना जे आचमन केले जाते ते या वाटीतील जलाने करतात. पळी हा शब्द कालमापक पळे यापासून आला आहे. घड्याळाचा शोध लावण्यापूर्वी कालमापनासाठी घटीकापात्र […]

देवपूजेतील साधन – रांगोळी

रंगवल्ली या संस्कृत शब्दापासून झालेले रुपांतर म्हणजे रांगोळी होय. भारतीयांचा कोणताही सण अथवा धार्मिक कार्य असो, दारापुढे रांगोळी काढण्याचा प्रघात पूर्वी पासून चालत आलेला आहे. रांगोळी काढल्यानंतर धार्मिक विधीला आरंभ होतो. दक्षिण भारतात अगदी रोज, तर बर्‍याच ठिकाणी सणासुदीला अंगणात अथवा दरवाज्यासमोर स्त्रिया रांगोळी काढतात. रांगोळी ही एक कला असून त्यासाठी निरनिराळ्या रंगांचा उपयोग केला जातो. […]

देवपूजेतील साधन – निरांजन

निर म्हणजे नाही व अंजन म्हणजे मळ किंवा काजळी. निरांजनातील तुपाच्या ज्योतीवर काजळी किंवा धूर दिसत नाही. म्हणूनच त्याला निरंजन म्हणतात. निरंजन याचा अर्थ ओवाळणे असाही आहे. देवाच्या पूजेची सांगता आरतीने होते. या आरतीमध्ये प्रज्वलित निरंजनाने देवाला ओवाळणे हा एक प्रमुख उपचार आहे. निरंजनाने देवाला ओवाळतात तेव्हा त्यात तुपात भिजवलेली वात असते तर स्त्री पुरुषाला ओवाळताना […]

देवपूजेतील साधन – शंख

सागरातून निर्माण झालेला शंख श्रीविष्णूने वध केलेल्या शंखचूड राक्षसाचे प्रतीक असून देवपूजेत याला मानाचे स्थान आहे. शंखाच्या मूलभागात चंद्र, कुक्षामद्ये वरुण, पृष्ठभागी प्रजापती आणि अग्रभागी गंगा व सरस्वती निवास करतात. पंचजन्य नाव असलेल्या शंखाला श्रीविष्णूने आपल्या हाती धरले आहे म्हणून शंखाला अग्रपूजेचा मान मिळाला असून त्याच्यामध्ये स्नान घालताना साठणारे जल सर्व देवांवर शिंपडण्यात येते. महाभारतातील युध्दप्रसंगी […]

देवपूजेतील साधन – तोरण

घरामध्ये लग्न,मुंज असो किंवा वास्तुशांत वा धार्मिक कार्य असो. घराच्या दरवाज्याला तोरण बांधण्याचा कुळाचार पूर्वीपासून चालत आला आहे. एका सुतळीला सोनेरी नक्षीचे पताका सारखे कागद लावून त्याच्या मध्यभागी सोनेरी कागद चिटकवलेला नारळ असतो यालाच तोरण असे म्हणतात. आंब्याच्या डहाळ्यांचे किंवा पानाफुलांचेही तोरण शुभ म्हणून समजले जाते. दरवाज्याला तोरण बांधल्याने दृष्ट प्रवृत्तीचा वावर घरात होऊ शकत नाही. उलटपक्षी […]

1 2
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..