देवपूजेतील साधन – कलश
भारतीय संस्कृतीमध्ये मंगलकार्यप्रसंगी कलशाला फार महत्त्व प्राप्त आहे. तांदळाच्या राशीवर ओल्या कुंकवाने स्वस्तिक काढून कलशाची स्थापना केली जाते. त्यामध्ये गंगा जल आणि पंचरत्ने घालून पंचपत्रीने तो सुशोभित करतात. त्यावर नारळ ठेवला जातो व मग कलशाची पूजा केली जाते. गंध, अक्षता आणि फुले वाहून देवघरात कलश ठेवला असता सुख, समाधान आणि शांती प्राप्त होते. समुद्र मंथनातून बाहेर आलेले अमृत भरण्यासाठी विश्र्वकर्म्याने सर्व देवांमध्ये असलेल्या […]