मराठे आणि दिल्ली – १८वे शतक – भाग ३
१७१९ मध्ये बाळाजी विश्वनाथ चौथाई व सरदेशमुखीची सनद घेऊन आला तो राजकीय वास्तव ओळखून आणि शाहूचा मुघली सत्तेविषयीचा दृष्टिकोण ध्यानात घेऊनच. शाहूला स्वतःसाठी विलासप्रिय व शांत जीवन हवे होते. त्यासाठी त्याच्या सरदारांनी मुलुखगिरी करून, चौथाई गोळा करून त्यातील हिस्सा त्याला दिला की तो खुष होता. […]