बागेतील तारका-
थांबव, विज्ञाना तुझे शोध
थांब विज्ञाना, नको लावूस शोध नष्ट करुनी भावना, नको गमवू आनंद / धृ / उंच मारुनी भरारी पोहंचला चंद्रावरी दाही दिशा संचारी नष्ट केलास तू , चांदण्यातील आनंद १ थांब विज्ञाना, नको लावूस शोध फुलांतील सुवास फळांतील मधुर रस पक्षांचा रम्य सहवास नष्ट केलास तू, निसर्गातील सुगंध २ थांब विज्ञाना, नको लावूस शोध नदीतील संथता ओढ्यातील […]
हें माणसा !
कृष्ण कमळ- […]
“आनंद” भावना
ध्येय असावे तुमचे नेहमीं आनंद मिळवण्याकडे ‘आनंद ‘ हाचि ईश्वर असतो समजून घ्याहो हे कोडे ।।१।। शरीर देई ‘सुख ‘ तुम्हांला क्षणिक ते तर असती सुखाच्या पाठीशी छाया असते ‘दुःख ‘ तयाला संबोधती ।।२।। सुखाबरोबर नाते असते सदैव अशाच दुःखाचे वेगळे त्यांना कुणी न करती जाणा तत्त्व हे जीवनाचे ।।३।। ‘आनंद ‘ भावना असे एकटी नसे […]
बघूनी सू्र्यपूजा पावन झालो
हासत आली सूर्य किरणे, झरोक्यातून देव्हाऱयात न्हाऊ घालूनी जगदंबेला, केली किरणांची बरसात पूजा केली किरणांनी, जगन्माता देवीची प्रकाश स्पर्शूनी चरणाला, केली उधळण सुवर्णाची तेजोमय दिसूं लागले, मुखकमल जगदंबेचे मधूर हास्य केले वदनीं, पूजन स्विकारते सूर्याचे रोज सकाळी प्रातःकाळीं, येऊनी पूजा तो करितो भाव भक्तिने दर्शन घेऊनी, सृष्टीवर किरणे उधळितो कोटी कोटी किरणांनी, तो देवीची पूजा करितो […]
मुक्तीसाठीं
रुजला पाहीजे विचार मनांत सारेच प्रभुचे असे ह्या जगांत जो वरी आहे मी माझे येथे असे त्या क्षणापर्यंत स्वार्थ मनीं वसे स्वार्थयुक्त मन मुक्त होत नसे मुक्ती येई पर्यंत पुनर्जन्म असे बिंबता मनांत माझे नाहीं कांहीं प्रभूचे समजता आत्मा मुक्त होई डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com
देवकी माता !
काय म्हणू ग तुजला देवकी भाग्यवान की अभागी ईश्वर तुझीया उदरी येवूनी सुख न लाभले तुजलागी // जन्मोजन्मीचे पुण्यसाचुनी मात्रत्व लाभे स्त्रिजन्माला तु तर असता जननी प्रभूची तुजविण श्रेष्ठ म्हणू कुणाला // राज वैभवी वरात निघता कारागृही तुज घेवून गेले अवताराची चाहूल असूनी दुःखी सारे जीवन गेले // कंसाने तव मुले मारीली निष्ठूर होऊनी स्वार्थापोटी तु […]
सु्र्य-चंद्राचा लपंडाव
बघा बघा तो रवि चालला, अतिशय वेगानें । पूर्व दिशेला चंद्रही येई, त्याच तन्मयतेने ।। युगानु युगें लपंडाव हा, त्यांचा चालला असे । भावांमधली शर्यत बघूनी, गम्मत परी भासे ।। मोठा भाऊ रवि त्याला, पकडण्या धांव घेई । लहान भाऊ चंद्र असूनी, निसटून मात्र जाई ।। संताप येता लाल होऊनी, रवि जाई तापूनी । परि शांत […]