पुण्य संचय करा
ज्या ज्या वेळी येई संकट, धांव घेत असे प्रभूकडे । संकट निवारण करण्यासाठीं, घालीत होता सांकडे ।। चिंतन पूजन करूनी, करीत होता प्रभू सेवा । लाभत होती त्याची दया, त्याला थोडी केव्हां केव्हां ।। संकटी येता करी पूजन, उपयोग होईना त्याचा । कामी येईल पुण्य , विचार करीतां भविष्याचा ।। संचित पुण्य आजवरचे, कार्य सिद्धीला लागते […]