बागेतील तारका-
आत्मविश्वास
आत्मविश्वास जागृत ठेवूनी, कार्य घेवूनी तडीस नेती । कधीही न राही अवलंबूनी, मदतीसाठी दूजा वरती ।। ईश्वर करीतो मदत तयांना, मदत करी जे आपले आपण । आपल्यातची तो ईश्वर आहे, असते याची जयास जाण ।। विश्वासाने हुरूप येई, जागृत करीती अंतर चेतना । लक्ष्य सारे केंद्रीत होता, यश चमकते प्रयत्नांना ।। डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com
राजमाता कैकयी
अकारण कां नांवे ठेवता सदैव कैकयीला । चित्त देवूनी समजूनी घ्या तुम्ही राजमातेला ।।धृ।। जेव्हां दशरथ युद्धास जाई । कैकयी त्याच्या सेवेत राही ।। राजनीति अन् युद्धनीति ही । अवगत झाली सारी तिजला ।।१।। चित्त देवूनी समजूनी घ्या तुम्हीं राजमातेला नजीकच्या त्या देशामधूनी । रावणादी असुरी शक्ती वाढूनी ।। सामान्य जनाला जर्जर करुनी । हा हाः […]
वचन
वाणी मधूनी शब्द निघाला,कदर त्याची करीत होते । मुखावाटे बाहेर पडे जे,वचन त्याला समजत होते ।। दिले वचन पालन करण्या,सर्वस्व पणाला लावीत होते । प्राणाची लावून बाजी,किंमत शब्दांची करीत होते ।। स्वप्नामध्ये दिले वचन,हरिश्चंद्र ते पालन करी । राज्य गमवूनी सारे आपले,स्मशानी बनला डोंबकरी ।। प्राण आहूती देई दशरथ,वनी धाडूनी राम प्रभूला । पालन केले तेच […]
मर्यादा
मर्यादेचा बांध घालूनी,मर्यादेतचि जगती सारे । अनंत असता ईश्वर,मर्यादा घाली त्यास बिचारे ।। जाण जगाची होई इंद्रियांनी,त्याला असती मर्यादा । विचार सारे झेपावती,ज्ञान शक्ती बधूनी सदा ।। अथांग वाटे विश्वमंडळ,दाही दिशांचा भव्य पसारा । ईश्वर आहे थोर त्याहूनी,मोजमापाच्या उठती नजरा ।। कशास करीतो तुलना सारी,भव्य दिव्यता आम्हा दाखवूनी । अज्ञानाने पडती मर्यादा,अनंत तत्वास त्याच क्षणी ।। […]
क्षण मुक्तीचा
तपसाधना करूनी मिळवी, सत्वगुणाची शक्ती अंगी । त्याच शक्तीच्या जोरावरती, स्थान लाभे त्यांना स्वर्गी ।। शक्ती ऱ्हास जे करिती त्याचा, सारे सुख आणि भोग भोंवतीं । परिणामी तो फेकला जाऊनी, पुनरपी येई याच भूवरती ।। एक दया दाखवी ईश्वर, वातावरणी देऊनी संधी । जन्म मिळे ते त्याच ठिकाणी, कमविले पुण्य ज्याने आधी ।। चक्र खेळ हा […]
प्रेमाचा उगम
दाखवू नकोस प्रेम तुझे उपरेपणाच्या भावनेने । तसेच मिळेल परत तुला केवळ वाणीच्या शब्दाने ।। कंठामधूनी भाष्य निघाले आदळे कर्णपटावरी । प्रेमाचा बघूनी ओलावा परिणाम होई मनावरी ।। शब्द निघता हृदयामधूनी झेप घेई हृदयस्थरावरी । आत्म्याची तळमळ भिडते आत्म्याच्या गाभ्यावरी ।। खोलवर आणिक जाता ईश्वर बिंदूत विलीन होतो । सत्याचा शोध लागूनी आनंदाचा पाऊस पडतो ।। […]
संशयाचे भूत
हे भूत संशयाचे छळते कसे मनाला । करीते सदा परि ते दिशाहीन विचारमाला ।। एकाग्रतेचा घात होई क्षणार्धात तेथे । डोलायमान होऊनी स्थिती बदलून जाते ।। गमवी विश्वास जेव्हां प्रभू अस्तित्व शक्तीचा । कळला न अर्थ त्याला या सत्य जीवनाचा ।। येता मनी संशय आपलाच ज्या घडीला । शोकांतिका जीवनाची ठरे त्याच क्षणाला ।। डॉ. भगवान […]
पूजा तयारी
रोज सकाळीं प्रात: समयीं, पूजा करी देवाची । पूजे मधल्या विधीत, चूक न होई कधी त्याची ।। स्नान करोनी नेसूनी सोंवळे, देव घरांत जाई । भाळी लावूनी गंध टिळा, मंत्रपाठ गाई ।। सहयोग देई पत्नी, पूजा कर्मामध्ये त्याला । आधींच उठोनी झाडूनी घेई, स्वच्छ करी देव घराला ।। करूनी सडा संमार्जन तेथें, सारवोनी घेई जागा । देवापुढती […]
पुनर्जन्म
संघर्षाची बिजें जळतील, जाणतां तत्व पुनर्जन्माचे । आपसांमधील हेवे-दावे, मिटून जातील कायमचे ।। फिरत असते चक्र भोवती, स्वार्थीपणाचे भाव आणिते ।। त्यांनाच मिळावे सारे काही, जाणता स्वरक्ताचे नाते । उगम झाला जाती धर्माचा, स्वार्थीपणाच्या याच कल्पनी ।। वाटीत सुटतो प्रेम तयांना, केवळ सारे आपले समजूनी । कन्या जेव्हां सासरीं जाते, नाती-गोती नवीन बनती ।। वाटत होते […]