नवीन लेखन...

मीरेची तल्लीनता

नाच नाचती तालावरती मीरेची पाऊले चित्त ते हरीमय जाहले. – – – धृ   लागला प्रभुचा ध्यास हरि दिसे नयनास चलबिचल नजर होऊन अंग सारे मोहरले   – – -१ चित्त ते हरीमय जाहाले   न राही आपले भान झाली भजनी तल्लीन तनमन प्रभुचे ठायी जाता संसार ते विसरले. – – – २ चित्त ते हरीमय जाहाले […]

पतंग

एक पतंग वरी चालला, डोलत आकाशीं भाळी त्याच्या यश कोरले, झेप घेई ती कशी ।। भरारी घेई पतंग ज्याला, आधार दोरीचा जाणीव होई येतां प्रसंग, त्याला कटण्याचा ।। धरतीवरी कोसळत असतां, दृष्टी टाकी आकाशीं इतर पतंग बघूनी बोलला, तोच स्वतःशीं ।। ” नभांग मोठे दाही दिशा त्या, संचारा स्वैरपणें आठवण ठेवा त्या शक्तीची, ज्याच्यामुळें जगणें ” […]

फुलझाडाचे स्वातंत्र

उगवले होते जंगलात ते उंच माळावरी रंग आकषर्क फुलझाडांचे मन प्रसन्न करी ।। जरी होता उग्रवास तयाला मधूरता आगळी खेचित होते सौंदर्याने फुलपांखरे जवळी ।। वनराईचा पुष्कराज तो डोलत होता आनंदे ऐकत होता मान हलवूनी कोकिळेची पदें ।। वर्षा विपूल प्रकाश विपूल आणिक तो वारा स्वच्छंदाचे भाव उमटवित वाढवी स्वैर पसारा ।। कुणीतरी आला वाटसरु तो […]

बाळाची निद्रा

चिंव चिंव करुं नकोस चिमणे, बाळ माझे झोपले काय हवे तुज सांग मला ग, देईन मी सगळे कपाट सारे उघडून ठेवले, समोर ओट्यावरी मेवा समजून लुटून न्यावे, डाळ दाणे पोटभरी घरटी बांध तूं माळ्यावरती, काडी गवत आणूनी कचरा म्हणूनी काढणार नाही, ही घे माझी वाणी नाचून बागडून खेळ येथे, निर्भय आनंदानें परि शांत न बसलीस तूं […]

खरा आस्तिक

नास्तिक असूनी श्रद्धा नव्हती, ईश्वराचे ठायीं विज्ञानाची कास धरुनी ती, भटकत तो जायी // चार पुस्तके वाचूनी त्याचे, तर्कज्ञान वाढले दृष्य अदृष्य तत्वांमधले , भेद जाणवले // नसेल त्याचे आस्तित्व कसे , तर्काला सोडूनी समजूनी ह्याला “अंध विश्वास” , देई फेटाळूनी // आधुनिक होते विचार त्याचे, कलाकार तो होता पृथ्वीवरील घटणाना परि , योग म्हणत होता […]

वेडा अहंकार !

एक पुरातन मंदिर दिसले माझ्या दृष्टीला शिवलिंग ते सुंदर असुनी नन्दी दारी बैसला जुनी वास्तू, पडझड दिसली अवती भवती झाडे जुडपे वाढून तेथे जागा ते अडविती किडे मुंग्या झुरूळ नि कोळी यांची वस्ती तेथे रान फुले ती उग्र वास तो दरवळीत होते. विषण्य झाले मन बघुनी अस्वच्छ परिसर राहील कसा ह्या वातावरणी मग तो ईश्वर पूजा […]

भूतदया जागविली

चिंव चिंव करीत चिमणा चिमणी खोलीमध्ये माझ्या आली । अवती भवती नजर टाकून माळ्यावरती ती बसली ।। वाचन करण्यात रंगून गेलो लक्ष्य नव्हते तिकडे । आश्चर्य वाटले बघून मजला काड्या गवताचे तुकडे ।। घरटे बांधण्या रंगून गेली आणती कडी कचरा । मनांत बांधे एकच खुणगांठ तयार करणे निवारा ।। भंग पावता शांत वातावरण वैताग आला मला […]

खोटा शिक्का

कसे आले कुणास ठाऊक नाणे माझे हाती गर्दीमधल्या कुण्या प्रसंगी खोटा शिक्का येती प्रयत्न सारे व्यर्थ जाऊनी कुणी घेईना त्यातें कसा आला नशिबी निराशा मनी येते अंध व्यक्तीचे स्टॉल बघूनी तिकीट एक घेतले लॉटरीसाठी घातला रुपया अंधाचे हाती दिले मनी चरकलो शब्द ऐकूनी त्या अंध व्यक्तीचे नशीब तुमचे थोर असूनी यश येईल तिकीटाचे केवळ त्याने स्पर्श […]

आईचे ऋण

मूर्तिमंत वाटे देवी लक्ष्मी प्रेमळ स्वरूप माझे आई धन्य जहलो जन्म मिळूनी उदरामाजी तुझिया ठायी प्रेमाचा तो सागर देखिला तुझ्याच ह्रदयाजवळी जावूनी निकटपणाचा आनंद घेत नऊ मास मी उदरी राहुनी दुग्धामृत पाजून मजला वाढवी अंकुर काळजीने घास भरवण्या काढून ठेवी उपाशी राहून आनंदाने निद्रा न लागे तुजला तेंव्हा आजारी जेंव्हा मी पडलो पाणी दिसले तुझ्या नयनी […]

1 6 7 8 9 10 12
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..