नवीन लेखन...

दुष्टाचा मृत्यु

सारे दुर्गुण अंगी असूनी, गुंड होता तो इतर जनांना त्रास देत, तुच्छ लेखितो शक्ति सामर्थ्य त्यांत असतां, फार मातला आया बहिणीना अपमानुनी, त्रासू लागला बळजबरीनें पैसे घेई, स्वार्था करिता हतबल होऊनी देऊ लागली, निराश होता केवळ त्याच्या अस्तित्वाने, सारे घाबरती पिसाट संबोधूनी तयाला, दुर्लक्ष करिती एके दिवशीं अवचित ती, दुर्घटना झाली उंचावरनी त्याची स्कूटर, खाली कोसळली […]

बागेतल्या तारका

बागेमधला निसर्ग सारा टिपत होतो मी रात्र पडूनी चंद्र आकाशी बाग झाली रिकामी १ बाकावरती बसून एकटा मोजत होतो तारे लुकलुकणारा प्रकाश तो अंक चुकवी सारे २ अगणित बघुनी संख्यावरी प्रसन्न झाले मन किती वेळ तो निघूनी गेला राहिले नाहीं भान ३ शितलेतेच्या वातावरणीं शांत झोप लागली नयन उघडतां बघितले मी पहांट ती झाली ४ गेल्या […]

अहं ब्रह्मास्मि

एके काळीं हवे होते, मजलाच सारे कांहीं आज दुजाला मिळतां आनंद मनास होई माझ्यातील ‘मी ‘ पणानें विसरलो सारे जग तुझ्यामध्येंही ‘ मी ‘ आहे, जाण येई कशी मग जेंव्हा उलगडा झाला साऱ्या मध्ये असतो ‘मी’ आदर वाटू लागला, जाणता ‘अहं ब्रह्मास्मि’ डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

नदीवरील बांध

विषण्यतेने बघत होतो भिंतीवरच्या खुणा काळ जाऊन वर्षे लोटली आठवणी देती पुन्हा बसत होतो नदीकांठी बालपणीच्या वेळी पात्र भरुनी वहात होती गोदावरी त्या काळी सदैव पूर येउनी तिजला गावास वेढा पडे गांव वेशीच्या घरांना मग पाण्याचे बसती तडे चित्र बदलले आज सारे पात्र लहान होई बांध घातला धरणावरी पाणी अल्पसे येई खिन्नपणे खूप भटकलो भोवतालच्या भागी […]

उदरांतील शेषशायी

मातेच्या उदरांत झोपला, शेषशायी भगवान वेड्यापरी त्यास शोधीतो, सागरी जाऊन शेषशायीचे चित्र बघतां, साम्य ते दिसेल उदरामधल्या बालकांतही, सारे तेच आढळेल शेषापरी वेटोळे असुनी, ‘ नाळ ‘ तयाला म्हणती क्षारयुक्त पाण्यामध्यें, बालक ते निद्रिस्त असती बालकाच्या नाभी मधुनी, येई कमलाकृती भाग जीवनसत्व त्यावर असुनी, ब्रह्मापरी दिसे अंग ‘ सो हं ‘ निनादुनी सांगे, ‘ मीच तोच […]

कीटकाचे ब्रह्मांड

कीटक ते लहान असूनी रहात होते फळामध्यें विश्व तयाचे उंबर फळ जीवन घालवी आनंदे……… १ ब्रह्मांडाची त्याची व्याप्ती उंबराच्या नसे पलिकडे ज्यासी ते अथांग समजले बघूनी त्या एका फळाकडे ………..२ माहित नव्हते त्या कीटकाला झाडावरची अगणित फळे सृष्टीतील असंख्य झाडे कशी मग ती त्यास कळे ………….३ आपण देखील रहात असतो अशाच एका फळावरी हीच फळे असंख्य […]

जन्मापूर्वी चाऱ्याची योजना

  जन्मापूर्वी चाऱ्याची योजना   योजना करी चाऱ्याची, मुख देण्याचे आधी, तुझ्या दयेची किमया, कळली न कुणा कधीं….१,   बदल करूनी शरिरी, मातृत्वाचे भरतो रंग, क्षिराचा देई साठा, पुलकित करूनी अंग…२,   सदैव तयार राहूनी, दाना देई भूमाता, कुणी न उपाशी राही, काळजी घेई विधाता….३,   जन्म देवूनी साऱ्यांना, पोषण तोच करितो अनंत उपकार करूनी, ऋणी […]

गीता – जीवनाची एक उकल

रणभूमीवर समर प्रसंगी मृत्यु असता सामोरी जीवनांची तत्वे सांगती गीते द्वारे श्रीहरी //धृ// अर्जुन असूनी महारथी द्विधा झाली मनःस्थिती सगे सोयरे तेथे बघूनी खालती बसला निराशूनी कसे मारुं मी माझेच सारे भगवंताला प्रश्न विचारी //१// जीवनाची तत्वे सांगती गीते द्वारे श्रीहरी कुणीही नाही कुणाचे येथे नाते गोते क्षणिक भासते सत्ता येथे चालते प्रभुची खेळणी सारी ठरते […]

स्वप्न आणि जागेपण

एक ती झोप स्वप्न बघत राही शिणवून शरीर ताप जीवास सुख देई स्वप्न जाई विसरुन जाग येता मनां जागे मन स्वप्नांत भासवी वेगळेपणा एकाच मनाच्या दिसे ह्या दोन भुमिका भिन्नता त्यांत भासे जाऊन दोन टोकां स्वप्न आणि जागेपण देहाच्या दोन स्थिती नाण्याच्या बाजू दोन एकमेका न मिळती डॉ. भगवान नागापूरकर २४- १११२८३

अजाणतेतील अपमान

स्फुर्ति येऊन कविता केली   आनंद झाला मनीं   । चटकन कागदावरी लिहीली   शब्द येतां ध्यानी   ।। कवितेतील शब्दरचना   झाली बहरदार   । कौतूकाची येई भावना   बघुनी शब्द भांडार   ।। पुर्ण करुनी कविता    टिपूनी घेतली वहीत   । काव्य रचना परत वाचतां   मग्न झालो आनंदात   ।। फेकूनी दिला कागद    ज्यावरी रचिली  कविता   । विचारांत होतो धुंद    कृत्य केले मी अजाणतां   […]

1 7 8 9 10 11 12
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..