MENU
नवीन लेखन...

चष्मा (गूढकथा)

पंतांना नुकतीच गाढ झोप लागली होती. वयोमान प्रमाणे, त्यांची झोप कमीच झाली होती, साडेबारा एक तर निद्रादेवीच्या आगमनाची, नेहमीचीच वेळ! अचानक त्यांना जाग आली. कोणी तरी हलवून जागे केल्या सारखी! काही क्षण ते अंथरुणावर तसेच पडून राहिले. आपण कोठे आहोत? हि कोणती जागा आहे? कोकणातली कारली तर नाही?  […]

हाकामारी ! (गूढकथा)

“मायला, लाईट गेली जणू! या खेड्यात एकदा का लाईट गेली की, माहेराला गेलेल्या बायकु सारकी लवकर येत नाही! ” तो स्वतःशीच पुटपुटला. हेडलाईटच्या उजेडात समोरून वेडा वेताळ हातवारे करत उभा होता. गावात हा वेडा कसा आला कोणास ठाऊक? पण त्याच्या वेडाचा गावकऱ्यांना काही त्रास नव्हता, आणि भूतदयेपोटी कोणी त्याला हुसकावून लावले नव्हते. म्हणून तो येथेच स्थिरावला. याचे वास्तव्य कायम मसणवट्या जवळच्या पिंपळाखाली, म्हणून लोक याला ‘वेताळ’ म्हणून हाक मारत. […]

आणि अचानक त्या वळणावर (रोमांचक भयकथा) – भाग १४

पण ही कथा फक्त निशा आणि रोहनची नाहीये…. असे आपल्या परिचयातले अनेक निशा आणि रोहन अचानक गेलेले असतात. पण व्यक्तीशः आपण…..आपण….असं कुणाच्याच बाबतीत परत होवू नये म्हणून काय करतो? या कथेच्या निमित्तानं मला तुम्हा सगळ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायच्या आहेत…. […]

आणि अचानक त्या वळणावर (रोमांचक भयकथा) – भाग १३

निशा रोहनला म्हणाली, “रोहन, हे लोकं असं सहजासहजी माझं ऐकतील, असं मला वाटत नाही.  चल, आपण जबरदस्ती त्यांच्या गाडीतून हॉस्पिटलमध्ये जाऊया.” असं म्हणून निशाने रोहनचा हात पकडला आणि ती जोरात ऍम्ब्युलन्सच्या दाराजवळ गेली. आत बसायला जागा कुठे आहे हे पाहण्यासाठी तिनं आत नजर टाकली आणि तिनं जोरात किंकाळी फोडली…..  आणि ती दचकून मागं सरकली….. […]

आणि अचानक त्या वळणावर (रोमांचक भयकथा) – भाग १२

दोन्ही गाड्या थांबलेल्या पाहून निशा आणि रोहन बाकावरून उठून तिकडे जावू लागले.  ऍम्ब्युलन्स मधून दोन माणसं उतरली. त्यांनी ऍम्ब्युलन्सचे मागचे दार उघडून त्यातून एक स्ट्रेचर बाहेर ओढून काढला आणि ते रस्त्याच्या कडेला झाडीत शोधू लागले. तोपर्यंत एक डॉक्टरही  खाली  उतरले.  त्या दोन लोकांच्या मागोमाग तेहि झाडीत खाली उतरू लागले. […]

आणि अचानक त्या वळणावर (रोमांचक भयकथा) – भाग ११

निशाने त्याच्या हाताला जोरात हिसडा दिला, “Please रोहन, तू माझ्या अंगाला हात लावू नकोस. आणि माझ्या मागेही येऊ नकोस.  मला तुझं काहीच ऐकायचे नाही. जाऊदे मला. Don’t touch me, Don’t touch me” […]

आणि अचानक त्या वळणावर (रोमांचक भयकथा) – भाग ९

बोलता बोलता रोहन आणि निशाने चढाचे वळण पार केले.  आता ते उताराच्या रस्त्याला लागले.  हे ठिकाण थोडं उंचीवर असल्याने या ठिकाणावरून झाडांमधूनही पुढचा बराच परिसर नजरेत पडत होता. आत्तापर्यंत चंद्र अगदी माथ्यावर आला होता, त्यामुळे लख्ख चांदणं पडलं होतं.  तेव्हड्यात निशाचं समोर लक्ष गेलं…. आणि तिनं  आनंदानं उड्या मारायला सुरुवात केली. ……. […]

आणि अचानक त्या वळणावर (रोमांचक भयकथा) – भाग ८

त्या दिवशी रिसेप्शन वरून परतायला उशीर होईल म्हणून ते गाडीवरूनच गेले होते. येताना त्यांच्या अंदाजापेक्षा जरा जास्तच उशीर झाला. रात्री घरी उशिरा पोहोचलो तर झोपायला उशीर होईल आणि सकाळी उठायला उशीर झाला तर कामावर जायला उशीर होतील या विचाराने रात्रीचे ११ वाजलेले असताना देखील त्यांनी या रस्त्याने घरी जाण्याचा निर्णय घेतला. […]

आणि अचानक त्या वळणावर (रोमांचक भयकथा) – भाग ७

ती दोघं आता त्या चढाच्या वळणावर पोहोचली होती….  तेवढ्यात त्यांना परत एका चारचाकी गाडीचा उजेड दिसला….. आता मात्र दोघंही त्यांचे हात हलवत मोठमोठ्यांदा हेल्प, हेल्प म्हणत रस्त्याच्या थोडे पुढे आले….. […]

आणि अचानक त्या वळणावर (रोमांचक भयकथा) – भाग ६

ते दोघं एकमेकांशी गप्पा मारत थोडावेळ चालत राहिले… खरोखरच रोहनची साथ मिळाल्यामुळं हा अवघड रस्ता पार करणं सोपं होवून गेलंय असं नीशाच्या मनात आलं. मघासची आंधाराची आणि एकटेपणाची भीती नीशाच्या मनातून पार हद्दपार झाली होती… आणि क्षणात तिचं मन एका अनोख्या सुगंधानं भारलं गेलं. […]

1 2
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..