भारतमातेच्या वीरांगना – ४८ – गुलाब कौर
स्वातंत्र्य संग्रामातील विषय, कामाचा आढावा सामान्य जनतेपर्यंत पोचवायची एकच पद्धत त्याकाळात उपलब्ध होती, ती म्हणजे पत्रक, वृत्तपत्र इत्यादी. गुलाब कौर ह्यांनी पत्रकारकेची भूमिका घेतली आणि त्यायोगे, घरा-घरातुन स्वातंत्र्य संग्रामशी जोडलेले साहित्य पोहचवू लागल्या. लोकांमध्ये स्वातंत्र्य संग्रामाबद्दल जन जागृती करणे हे त्यांचे मुख्य कामच झाले जणू. एक पत्रकार म्हंटल की थोडी सहूलत पण मिळत असेल बहुदा म्हणून मग त्यांनी आपल्या शबनम बॅग मधून क्रांतीकारकांसाठी दारुगोळा, पिस्तुलं अशी ने आण सुरू केली. एकूणच त्याचा समजात वावर बघता इंग्रजांना त्यांच्यावर शंका येऊ लागली. ते पण एखादा सुगावा / पुरावा मिळतो का ह्यासाठी त्यांच्यावर पाळत ठेवूनच होते. दैवदुर्विलास एकदा अश्याच गुलाब कौर क्रांतिकारी साहित्याच्या वाटप करायच्या उद्देशाने बाहेर पडल्या, ह्यावेळी त्यांना पिस्तुलं आणि काडतुस पोहचवायची होती, पण त्या सगळ्या मुद्देमाला सह पडकल्या गेल्या. इन्कलाब जिंदाबाद चा नारा परत एकदा पूर्ण आसमंतात घुमला. […]