भारतमातेच्या वीरांगना – ३७ – दुर्गाबाई देशमुख
१९२३ साली काँग्रेस चे अधिवेशन त्यांच्या गावी झाले. त्यावेळी दुर्गाबाई तिथे कांग्रेस कार्यकर्त्या म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या कडे खादी प्रदर्शनात कोणीही विना तिकीट प्रवेश करणार नाही ही जवाबदारी दिली होती. त्यांनी अगदी नेहरूंना सुद्धा तिकीट दाखवे पर्यंत सोडले नाही. त्या महात्मा गांधींच्या अनुयायी होत्या. असहकार आंदोलन,मिठाची चळवळ अश्या सगळ्यात सक्रिय सहभाग नोंदवला, परिणामी १९३० ते १९३३ च्या दरम्यान त्यांना ३ वेळेस कारावास भोगावा लागला. कारावासात सुद्धा त्या इतर महिलांशी संवाद साधणे, त्यांच्या शैक्षणिक भूक जगविणे, त्यांना सामाजिक जाणिव करून देणे अशी सगळी कामे करत राहिल्या. […]