भारतमातेच्या वीरांगना – 5 : झलकारी बाई
आपल्या सरदारांच्या सल्ल्यावरून राणीने किल्ला सोडून जाणे योग्य राहील असे ठरले. ह्या कठीण प्रसंगी झलकारी बाईंने समजदारीचा, स्वामीभक्तीचा आणि राष्ट्रप्रेमाचा परिचय दिला, राणीच्या वेषात किल्ल्यात लढत राहिल्या, आपल्या सैनिकांचे मनोबल खच्ची नाही होऊ दिले. इंग्रजांना कळलेच नाही की राणी नाहीये. राणी ला मार्गक्रमणासाठी वेळ मिळाला. झलकरीने बाईंनी फक्त राणीचे वस्त्रच परिधान नव्हते केले तर त्यांचा आत्माही राणीचाच होता असा भास होत होता. […]