मराठे आणि दिल्ली – १८वे शतक – भाग ७
समारोप – मराठे एक सत्ता म्हणूनच राहिले, त्यांचे भारतव्यापी साम्राज्य झाले नाही, ते दिल्लीपती झाले नाहीत, ही गोष्ट खरी आहे. ते नाकारण्यात अर्थ नाही. परंतु त्याची कारणे सैनिकी व आर्थिकही आहेत. त्याची कारणे त्या काळातील प्रमुख राजकारणाशी संबंधित आहेत. ‘मराठी’ मनोवृत्ती, ‘मराठी’ संस्कृती किंवा ‘मराठी’ परंपरा संकुचित व अल्पसंतुष्ट होती असे अजिबात दिसून येत नाही. […]