नवीन लेखन...

किचन क्लिनीक – धणे

धणे व कोथिंबीर ह्यांचा उपयोग आपण आपल्या जेवणात नेहमीच करतो.धणे हा मसाल्याचा एक पदार्थ.गोव्यात ह्याचा नियमीत उपयोग हा माशांची आमटी अर्थात हुमण करताना केला जातो तसेच गरम मसाला करताना देखील ह्याचा उपयोग केला जातो. धणे हे कोथिंबीरीच्या क्षूपाचे फळ आहे.धणे हे चवीला गोड,कडू,तुरट अशा मिश्र चवीचे असते.आणी हे थोडे उष्ण असतात.उष्ण असले तरी देखील हे शरीरातील […]

किचन क्लिनीक – खसखस

कोणी छानसा विनोदी चुटकुला सांगितला आणी सगळे जण हसायला लागले कि त्या व्यक्तीला दाद देण्यासाठी म्हटले जाते कि तुमच्या विनोदाने तुम्ही छान हास्याची खसखस पेरलीत.तर असा हा गरम मसाल्यातील पदार्थ.खरे तर ह्या अफूच्या बोंडामधील बिया होय पण ह्या मात्र अफूच्या प्रमाणे मादक नसतात. खसखसचा उपयोग गरम मसाल्या मध्ये,तसेच खीर मिठाई इ पदार्थ बनवताना केला जातो.साधारण रव्या […]

किचन क्लिनीक – हिंग

मसाले वर्गातला हा पदार्थ त्याच्या उग्र वासाने जेवणाला एक विशिष्ट चव आणि खमंग पणा आणण्याचे काम उत्तम बजावतो.फोडणीला खरोखरच चिमूटभर हिंग घातल्या शिवाय मजा नाही,एवढा फरक ह्या हिंग महाशयांच्या अनुपस्थितीने आपल्या जेवणात पडतो.व्यवहारात देखील ‘हिंग लावणे’ हा वाक्प्रचार जेवणात आणी व्यवहारात दोन्ही कडे उपयोगी पडतो. चला तर मग करून घेऊयाना ह्या हिंग रावांची एक वेगळी ओळख.हिंग […]

किचन क्लिनीक – जायफळ

जायफळ हा भारतीय स्वयंपाकामध्ये वापरला जाणारा मसाल्याचा पदार्थ. गोडाची खीर असो साखरभात असो जायफळ घातल्या शिवाय त्यांना मजा नाही.गरम मसाला असो कि दिवाळीच केला जाणारा फराळ ह्याच्या हजेरी शिवाय सगळेच फिके. मसाले दूध म्हणू नका की चहाचा मसाला सगळ्यांतच हा हवा. असे हे सुगंधी जायफळ ह्याचा भला मोठा उंच सुगंधी व्रुक्ष असतो. आणी जायफळ हे त्याचे […]

किचन क्लिनीक – तमालपत्र

हि मध्यम उंचीच्या सुगंधी व्रुक्षाची पाने असतात.ह्यांचा उपयोग आपल्या स्वयंपाकात तसा पुष्कळ होतो असे नाही पण काही खास व्यंजनांमध्ये हटकून ह्याचा वापरहोतो.पुलाव,बिर्याणी,मसालेभात,तसेच गरम मसाला ह्यात ह्याचा वापर होतो.ह्याच्या विशिष्ट सुगंधाने हे पदार्थ जास्त खमंग लागतात ह्यात वादच नाही. गोड,तिखट,कडू अशी ह्याची मिश्र चव असते आणी हि उष्ण असतात.ह्यास बोलू भाषेत तेजपत्ता असे ही म्हणतात.ह्याचे देखील काही […]

किचन क्लिनीक – कढिपत्ता

हि वनस्पती न ओळखणारी भारतीय व्यक्ती अत्यंत दुर्मिळ असेल.बहुतेक करून शाकाहारी जेवणामध्ये ह्याचा वापर जास्त केला जातो.फोडणी मग ती कशाला ही असो चिवडा,उपिट,पोहे,आमटी,डाळ,फोडणीचा भात,भाज्या अशा एक ना अनेक पदार्थांना फोडणी देण्यासाठी ह्याचा देखील आवर्जून वापर केला जातो कारण ह्याच्या विशिष्ट रूचीवर्धक सुगंधाने (इथे मन मोहक वापरणे इष्ट वाटले नाही)प्रत्येक पदार्थाची लज्जत वाढवितो.असा हा कढिपत्ता . ह्याचा […]

किचन क्लिनीक – हळद

‘पी हळद हो गोरी’ ही म्हण मराठी मध्ये रूढ आहे.म्हणूनच तर भारतीय संस्क्रूती मध्ये हळदीला एक वेगळे स्थान आहे.अगदी आपल्या हिंदू धर्मात देवकार्या पासून ते लग्ना पर्यंत हिचा वापर होतो.बहुधा हिच्या मधल्या रक्षोघ्न ह्या गुणांमुळे अर्थात वाईट शक्तींना दूर ठेवण्यासाठी हिचा वापर भोजना व्यतिरिक्त ब-याच अन्य कार्यात देखील केला जात असावा. देवपूजेत देवाला हळद कुंकू वहातात,नव्या […]

किचन क्लिनीक – वेलची(छोटी)

गोडाचा शिरा म्हणा,खीर म्हणा,मिठाई,मुरांबा, कोणताही गोड पदार्थ घ्या हिचा मनमोहक सुगंध त्या पदार्थाला आला नाहीतर त्या गोडधोड पदार्थाची सगळी मजा आणी लज्जतच निघून जाते बुवा. तर अशी सुंदर नाजूक सुवासिक वेलची अथवा वेल दोडा.विडा,चहा ह्यांना देखील एक वेगळीच रंगत देऊन जाते नाही का? गरम मसाल्यातील हा पदार्थ ह्याचे छोटे क्षुप असते आणी आपण वापरतो ती वेलची […]

किचन क्लिनीक – बडीशेप

हिला नओळखणारी व्यक्ती भारतात तरी सापडणे नाही.आपण हाॅटेल मध्ये गेलो जेवून आटपले की बिल देताना (कदाचित त्याची चुटचुट लागू नये म्हणून असेल)प्रत्येक हाॅटेल मध्ये मुखशुध्दी करिता सुंदर प्लेट मध्ये वेगवेगळ्या स्वरूपात (भाजून,साखरेचे रंगीत कवच असणारा,सुवासिक इ)हिला समोर ठेवले जाते. तर अशी हि सुंदर सुवासीक बडीशेप गरम मसाला बनवताना त्यात देखील वापरली जातेच.शिवाय मुखशुध्दीकरीता देखील उपयुक्त आहेच.तसेच […]

किचन क्लिनिक – जिरे

आपल्या जेवणामध्ये फोडणीला जीरे न वापरल्यास फोडणीची मजाच येत नाही.आपल्या विशिष्ट चवीने आणी सुगंधाने आपल्या भारतीय स्वयंपाकामध्ये मानाचे स्थान असणारा हा पदार्थ.वरण असो की भाज्या किंवा मग आपल्या जेवणात हमखास वापरले जाणारे मसाले जसे मालवणी मसाला,गरम मसाला,गोडा मसाला ह्या जीरे महाशयांच्या उपस्थिती शिवाय पुर्णत्वाला येणे अशक्यच आहे. जिरे हा पदार्थ म्हणजे छोट्या क्षुपाला लागलेल्या बिया होय.जीरे […]

1 2 3
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..