द लॉर्डस्…. (माझी लंडनवारी – 17)
आम्ही RCA वर पोहचलो तोपर्यंत १-१.३० वाजला होता. रिसेप्शनिस्टशी बोलून प्रियांकाची २ दिवसांची सोय गेस्ट म्हणून माझ्याच रुममधे केली. थोडेफार वरचे चार्जेस् भरले. स्वस्तात काम झालं.अर्धा दिवस असाही संपला होता. आता विम्बल्डन शक्य नव्हते. माझ्यासारखीच प्रियांका पण क्रिकेट वेडी होती आणि लॉर्ड्स बघणे तिच्यासाठी एक पर्वणी होती. मग बहुमताने लॉर्डसवर शिक्का मोर्तब झाले. बाहेरच काहीतरी खावून पुढे जावूयात असे ठरले. आज मी, प्रियांका आणि उमेश […]