नवीन लेखन...

खंत…

दिसत नाही मला माझं गांव जगाच्या नकाशात मला लाज वाटते त्याची मी खंतावतो… मी फिरतो जगभर धुंडाळतो नवनवी शहरं करतो वाहवाई तिथल्या सुधारणांची करतो घाई माझं गांव ‘तसं’ बनवण्याची आणि बघतो स्वप्नं निवृत्तीनंतरच्या वास्तव्याची येतो गांवात सारखे-सारखे करु लागतो बदल ‘तिथल्यासारखे’ बदलतं गांवाचं रूप काय सांगू त्याचं अप्रुप? पोस्ट करतो त्याच्या प्रकाशफिती सांगतो त्याची माहिती शहरातून […]

काहीतरी…

काहीतरी आहे असे जे तुझ्यात मुरले आंत आहे राख तू होशील तेव्हा ते जाईल म्हटले जात आहे।। तुझ्यात मुरले आंत काही वेगळेच हमखास आहे नावडो आवडो कुणालाही त्यानेच जीवन खास आहे ।। वेगळेच हमखास त्याने पोसलेला पिंड आहे तरीच ना? हरघडी नव्याने लढवतोस तू खिंड आहे।। पिंड असूदे नसूदे न्यारा ‘अंतरंग’ वेगळा आहे जगण्याच्या तुझ्या कलेला […]

पोस्ट…

पोस्ट… काल मातृदिन झाला पोस्टचा पाऊस पडला बहुतेक फाँरवर्ड केलेल्या काही कविता नव्याने लिहीलेल्या काही जुन्याच नव्याने डकवलेल्या पोस्टखाली इमोजीही तेच ते अंगठे, नमस्कार, गुलदस्ते… आज त्याने मोबाईल उघडला तर पोस्ट आईचीच होती पण… चार दिवस चालत शहरातून गावात थकून घरी आलेल्या आपल्या एकुलत्याच मुलाला कोरोनाच्या भयाने घरात न घेणाऱ्या आईची… पोस्टखाली थोडे इमोजी होते काही […]

मोहाचे घर

मनाच्या हळुवार तारा……. आज छेडील्या कोणी जरा। तशी बावरले मी मोहरले मी ……..सूर नवे जागले।।१।। झुळुक सुरांची आली……… गोड सुखाची बरसात झाली। अंकुरली प्रीत ओलेत्या मातीत ……..मलाही ना कळले।।२।। हुंकारलीे ती मनात………….. जीव आसावला आत आत। वेगळी जाणीव नुरली उणीव …….स्वप्नच आकारले।।३।। स्वप्नाची भूल धुसर….. दिसे प्रेमाचे गांव सुंदर। मागे मागे जशी चालले मी अशी ………….लगबगी […]

वळण…

सुरुवात जेव्हा सरळ रस्त्यावरुन होते तेव्हा फक्त भावी जीवन, आणि त्याच्या सुखसोयींच्या सुंदर कल्पनाच घोळत असतात मनात! त्या आनंदाला मग हव्या प्रसंगांचे नवे नवे धुमारे फुटतात. आणि मग डोळ्यांना मनाला तेच मनोहारी देखावे भुरळ घालीत राहतात. मनावर ही अशी सुखाची साय धरत असतांना, जीवन किती सुंदर आहे याचीच अनुभुती होत असते सतत. सगळंच कसं हवहवसं संपू नये असं वाटणारं असतं ना? […]

प्रेम

वैभवाची झुल माझ्या काल होती आज नाही … बेगडी प्रेमास त्यांच्या मग तसा तो ऊत नाही !!! ……..मी मानसी

‘मी’

शिकावेच म्हणतो मी अता चेहरे बदलायला… अनोळखी माणसात माझ्या ओळखीचे व्हायला!!! ….मी मानसी

खेळ..

तू ध्यास, तू भास, तू न्यास हव्या प्रेमाचा ! तुजसवे खेळते सारा ….खेळ कल्पनेचा !! ….मी मानसी

अबोला

अबोलाही बोलतो काही ऐकूनी होतो असे । अबोल मी आहे कधीचा कोणाही न कळले कसे? …..मी मानसी

1 2
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..