प्रकाश आणि तम
प्रकाश आणि अध:कार तो, दोन बाजू नाण्याच्या सत्व नि तमोगुण, ठरती त्या प्रभूच्या….१ सृष्टी दिसे समोर आपल्या, नयन ठेवूनी उघडे अध:कार वाटे आम्हां, त्याच मिटलेल्या डोळ्याकडे…२ जाण देई आंतून कुणी, प्रकाश तमाच्या आस्तित्वाची आगळ्या नसूनी स्थिती दोन्हीं, कल्पना केवळ विचारांची…३ डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com