नवीन लेखन...

विष्ठा

विष्ठा बघूनी थुंकलो, घाण वाटली मजला, अमंगल संबोधूनी, लाखोली देई तिजला  ।।१।।   संतापूनी मजवर , कान उघडणी केली, तुझ्याचमुळें मूर्खा मी, अमंगळ ती ठरली।।२।।   आकर्षक रूप माझे, लाडू करंज्यानें युक्त कपाटातूनी काढूनी, केले सारे तूंच फस्त ।।३।।   परि मिळतां तुझा तो, अमंगळ सहवास, रूप माझे पालटूनी, मिळे हा नरकवास ।।४।।   डॉ. भगवान […]

काळ घेई बळी

जात असता गाडी मधूनी, दुर्घटना ती घडली, अचानकपणे एक दुचाकी, आम्हा पुढे धडकली ।।१।।   प्रयत्न होऊनी योग्य असे, थोडक्यात निभावले, वखवखलेल्या काळालाही, निराश व्हावे लागले ।।२।।   घिरट्या घालीत काळ आला, झडप घातली त्याने, वेळ आली नव्हती म्हणूनी, बचावलो नशिबाने ।।३।।   अपमान झाला होता त्याचा, सुडाने तो पेटला, थोड्याशाच अंतरी जावूनी, दुजाच बळी घेतला […]

विश्रांती

धावपळीचे जीवन सारे, मिळे न कुणा थोडी उसंत विश्रांतीच्या मागे जाता, दिसून येतो त्यातील अंत ।।१।।   चैतन्यमयी जीवन असूनी, चक्रापरी ते गतीत राही चक्र थांबता क्षणभर देखील, मृत्यूची ते चाहूल पाही ।।२।।   थांबत नसते कधीही जीवन, अंत ना होई केंव्हां त्याचा निद्रा असो वा चीर निद्रा, विश्रांती ही भास मनीचा ।।३।।   थकून जाई […]

आत्म्याचे मिलन

आत्म्याचे मिलन परमात्म्याशी, हेच जीवनाचे ध्येय असे, आत्मा ईश्वरी अंश असूनी, त्यालाच मिळण्या उत्सुक असे ।।१।।   देह पिंजऱ्यांत अडकता, बाहेर येण्या झेप घेई तो, अवचित साधूनी वेळ ती, कुडी तोडूनी निघून जातो ।।२।।   कार्य आत्म्याचे अपूरे होता, पुनरपी पडते बंधन, चक्र आत्म्याचे चालत राही, मुक्त होण्याचा येई तो क्षण ।।३।।   डॉ. भगवान नागापूरकर […]

अंतर्मनातील आवाज

ध्यान लागतां डुबूनी जाई अंतर्यामीं बाह्य जगाला त्याच क्षणीं विसरतो मी ।।१।।   चित्त सारे केंद्रित होई आत्म्याकडे दुर्लक्ष्य होऊनी देहाचा विसर पडे ।।२।।   संवाद होता आत्म्याशी विचारा सारे आतून कांहीं ।।३।।   आंतल्या आवाजांत  सत्याचा भाव भविष्यातील घटणाचा त्यासी ठाव ।।४।।   नियमीत ध्यान साधना करती इतर जीवांचे प्रश्न समजती ।।५।।   ऋषीमुनींना ध्यान […]

लज्जा

साडी चोळी सुंदर नेसूनी, आभूषणें ती अंगावरती, लज्जा सारी झांकुनी टाकतां, तेज दिसे चेहऱ्यावरती   ।।१।।   आत्म्यासम ती लज्जा भासे, सौंदर्य जिवंत त्याच मुळें, लोप पावतां लज्जा माग ती, जिवंतपणा तो कसा कळे   ।।२।।   लपले असते सौंदर्य सारे, एक बिंदूच्या केंद्रस्थानीं शोध घेण्या त्याच बिंदूचा लक्ष्य घालतां उघडे करुनी   ।।३।।   विकृत ती मनाची वृत्ती […]

आत्मा हाच ईश्वर

आत्म्याला ओढ असते     ईश्वराच्या मिलनाची जाण सदैव राहते     प्रभुमय स्वरुपाची   ।।१।। अंशात्मक भाग असे    आत्मा हा परमात्म्याचा उत्कंठ ते  आकर्षण     गुणस्वभाव तो त्याचा   ।।२।। आत्म्यास पडले असे    बंधन ते शरीराचे जीवन कार्ये करुनी    प्रयत्न करी मुक्तीचे   ।।३।। मुक्त होई त्या क्षणीं    अनंतात समावतो परमेश्वरि रुपांत    विलीन होऊन जातो   ।।४।। आत्मा मुक्त होत असे     देहकर्म फळावर […]

बेताल स्वछंदीपणा

काढूनी झाडाच्या सालींचा    आडोसा घेतला ज्या कुणीं स्वांतंत्र्याच्या कल्पनेला      बंधन पडले त्या  क्षणीं   ।।१।।   नग्नपणें फिरत होता    श्र्वानासारखा चोहींकडे सुसंस्कृतीची जाण येतां    स्वच्छंदाला बाधा पडे    ।।२।।   स्वतंत्र असूनी देखील    पडते  परिघ भोवती जीवन जगण्या करितां    बंधने ती कांहीं लागती    ।।३।।   स्वांतत्र्याची  तुमची व्याप्ती     असावी  दुजांना जाणूनी दिव्य करण्याच्या ईर्षेने    संस्कृतीस होइल […]

ज्ञान साठा

जमीन खोदतां पाणी लागते, हीच किमया निसर्गाची, कमी अधिक त्या खोलवरती, साठवण असे जलाशयाची ।।१।।   प्रत्येक जणाला ज्ञान देवूनी, समानता तो दाखवितो, अज्ञानाचा थर सांचवूनी, आम्ही आमचे ज्ञान विसरतो ।।२।।   एक किरण तो पूरे जाहला, अंधकार तो नष्ट करण्या, ज्ञान किरण तो चमकूनी जातां,  फुलून येते ज्ञान वाहण्या…..३ डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०

त्यांचे नाते

कोण लागतात माझे, नाते ते ठाऊक नाहीं, देऊनी जातात मात्र, बरेच मजला काहीं ।।१।।   विठ्ठल- रामाचा नाद, गुंजन करितो येथें, पवित्र वातावरण, येण्यानी होवून जाते ।।२।।   देवाण घेवाण आत्म्याची, आपसामध्यें चालती, शब्द फुलांची गुंफण, त्वरीत होऊन जाती ।।३।।   फुले देऊनी मजला, हार गुफूंन घेतात, दोघे मिळूनी तो हार, प्रभूस अर्पूं सांगतात ।।४।।   […]

1 2 3 4 5 11
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..