गर्भावस्थेतील आनंद
जीवनातील परमानंद, केंव्हां लाभतो त्या जीवना ? मातेच्या त्या उदरामध्ये, शांत झोपला असताना ।।१।। असीम ‘आनंद’ अनुभव, घेत असे तो जीवात्मा सोsहं निनाद करूनी, सांगतो मीच परमात्मा ।।२।। आनंदाने नाचू लागतो, मनांत येता केंव्हां तरी, मातेलाही सुखी करती, त्याच्याच आनंदी लहरी ।।३।। पुढे त्याचे प्रयत्न होती, मिळवण्या तोच आनंद सुख, दु:खाच्या चक्रामध्ये, विसरूनी […]