नवीन लेखन...

आमची शाळा

गिरगावातील रस्त्यावरी दोन देवळांच्या शेजारी ‘आर्यन’ आहे आमची शाळा जेथे ज्ञान मिळते बाळा नाव शाळेचे लहान आहे लहानथोरांच्या मुखी आहे येथून शिक्षण घेऊन गेले देशमुखांदी मोठे झाले आम्हीही शिक्षण घेऊन जाऊ परंपरा त्यांची पुढे चालवू सर्वांना जी समान मानते ती शाळा मला खूप भावते शाळा ही आवडती असे अभिमान तिचा हृदयी वसे -यतीन सामंत ऋणानुबंध या […]

शांततेचे स्वप्न

जिथे नसावा गलबला, गलका, कोलाहल काही काळालाही शाप नसावा, लगबग वा घिसाडघाई मनस्ताप वा कसली चिंता, गोंगाटही नाही शांततेला मग धीर यावा, नीरवता जिवंत व्हावी ॥ असावी शांततेला एक वात्सल्याची झाक काळालाही नसावा वेळेचा काही धाक ऐकू यावी अंतरीची केवळ हळूवार हाक समाधि लागावी या जगाची न उरे जाग ।। जिथे विहरावा वारा मुक्त आपुलकीचा आज […]

जीवनातील प्रश्न

वर्षावती अखंड जीवनी परागकण छोटे छोटे अगणित असे चैतन्यकण अमोलिक असतो अविरत अपूर्व आनंद जपण्यात जगण्यातले सारे इवलेपण इवल्या गोजिऱ्या हळव्या कळ्या नाजूक निष्पाप कोवळ्या पाकळ्या फुलतानाही बिचकत दचकत अवघडलेल्या उबदारशा एका ओंजळीस आसुसलेल्या निर्माल्यणापूर्वी हृदयी धरुन येतील फुलवता मळे का? अथक, अखंड ध्यास हव्यासाचा धडपड मी माझा जोपासण्याचा सोडून भास मृगजळ गाठण्याचा का न वहावा […]

प्रेम करावे कणाकणाने

प्रेम करावे मनामनाने, प्रेम करावे क्षणाक्षणाने नसावे ओझे दडपणाने, प्रेम करावे कणाकणाने प्रेम नसावे प्रभावळीचे घनघोर वा वर्षावाचे घुसमटवणारे, गुदमरवणारे बिचकून टाकत दिपवण्याचे प्रेम फुलावे प्राजक्तकळ्यांनी सतत सुगंधित या क्षणांनी प्रेम करावे करांगुलीने, निर्व्याज्य अशा निखळतेने प्रेम ना व्हावे शिकवणुकीने, शिस्तीने – जबरदस्तीने प्रेम वहावे अंतउर्मीने, कळकळ आतुर आपुलकीने प्रेम नाही सोपस्कार, उरकून कोरडा उपचार प्रेम […]

प्रेम – आहे तरी काय?

प्रेमात कशिश आहे, कोशिश आहे, आतिश (बाजी) आहे नि कधी कधी साजिशही आहे आणि हे सारं करायला दैवी आशिषचीही गरज आहे प्रेमात आमिष आहे, ते सामिषही (बऱ्याचदा) असू शकतं. प्रेमात ईश आहे, इश्श्य तर आहेच आहे. त्यात he नि she लागते प्रेम wishही आहे नि विषही ते असू शकतं प्रेम विशेष आहे, पण त्यातून ‘we’गेलं की […]

आनंदाचा पारिजातक

छोट्या छोट्या अशा क्षणांतील मजा चाखता जगता यावे पार नसलेल्या आनंदालाही मग इवल्याशा मुठीत मावता यावे थकून सायंकाळी घरी आल्यावर प्रसन्न वदनी दीप उजळावे दाराआड लपलेल्या गंमतीने चिमुकल्या पावलांचे रुप घ्यावे हेतूक-अहेतूक नाजूक कटाक्षांनी मोहरत्या कळ्यांचे गंध व्हावे जीवन उरवणाऱ्या क्षणांना धडकत्या स्पंदनांनी साक्ष रहावे दाटून येणाऱ्या स्निग्धतेतून पोक्तशा मायेचे स्पर्श जाणवावे जीवनाशी नाळ अजून अबाधित […]

मुलांचं विश्व

आमच्यासाठी घर हेच आमचं संपूर्ण विश्व होतं विश्वाच्या पसाऱ्यात यांना मग आमचंच घर कसं दिसत नाही आसूसून यांच्यासाठी आम्ही किती जमवले आनंदाचे कवडसे नाही खिजगणतीतही त्यांच्या आम्ही किंवा आमचे उसासे उमेद होती तेव्हा कशाकशाची तमा नाही बाळगली श्रमाची उमजत नाही बाळगावी का उमेदही यांच्या तारतम्याची केवढा ध्यास आम्हाला, यांचे हात लागावेत गगनाला पाय तरी ठरतील जमिनीत […]

जीवन असं असावं

जीवन असावं पिकल्या आंब्यागत मोहकगोड, रसाळ, सतेज रसरशीत जीवन असावं चंदनाच्या खोडागत ललाटं रेखून अनेकांची रहावं दरवळत जीवन असावं देवाजीचा देव्हारा पावित्र्याच्या ज्योतीने उजळावा गाभारा आयुष्याच्या ढालीने सग्यासोयऱ्यांना जपावं उकळत्या दुधावर कसं सायीगत पसरावं जीवन असावं स्वच्छ अंगण मोकळं सर्वांसाठी एैसपैस मध्ये तुळशीचं खळं जीवन असावा एक आधारवृक्ष विशाल, समृद्ध, शीतल सावलीछत्र जीवन असावं टवटवीत नित […]

हे पोष्टमणा

ये रे ये रे पोष्टमणा माहेरच्या आण डाकें मना लागे हुरहुर वरण होई फिके-फिके वाटेकडे तुझ्या डोळे लावून लावून, मला चष्मा लागे चित्त न लागे स्वयंपाकात भातातही खडे लागे पायातली काढून हाणू कारे सुंदर तुझ्या ह्या थोबड्यावरती लक्ष न देताच जातोस मेल्या दारावरुन माझ्या पुढती काय मेले लफडे तुझे शेजारच्या टवळी संगे रोज-रोज कार्डे द्याया तिच्या […]

1 4 5 6
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..