नवीन लेखन...

मार्शलींग यार्ड

कोणतीही मालगाडी नीटपणे न्याहाळली तर असं लक्षात येतं, की तिला भारतातील वेगवेगळ्या विभागांचे डबे जोडलेले असतात. नॉर्थन रेल (एन.आर.), वेस्टर्न रेल (डब्ल्यू.आर.), वगैरे. असे डबे काही महत्त्वाच्या जागी एकमेकांना जोडले जाऊन त्यांची ६० ते ७० डब्यांची मालगाडी तयार होते. ज्या जागी अशा अनेक मालगाड्यांचे डबे वेगवेगळ्या विभागांतून येतात त्या जागांना ‘मार्शलींग यार्ड’ म्हणतात. यांमध्ये मुख्यत: दोन […]

रेल्वे आणि मालवाहतूक

रेल्वेच्या विस्तारामुळे मालाच्या देशांतर्गत वाहतुकीत प्रचंड प्रमाणात वाढ होत गेली असून, त्याचा आलेख दिवसेंदिवस चढताच आहे. त्याचबरोबर परदेशांशी होणारी आयात व निर्यात यांतही भरघोस भर पडलेली आहे. शेतीच्या अर्थव्यवस्थेत तर क्रांतीच घडविली गेली. रेल्वेद्वारे होणाऱ्या मालवाहतुकीमुळे देश प्रगतीच्या वाटेने चालू लागला व त्यामुळे आज भारत स्वत:च्या पायांवर खंबीरपणे उभा आहे. आसाममधील चहा व ज्यूट; राणीगंजमधील कोळसा; […]

रेल्वेच्या डब्यांतील स्वच्छतागृहं

प्रवासी रेल्वेमधील प्रत्येक डब्याला दोन्ही बाजूंना दोन अशी समोरासमोर एकूण चार स्वच्छतागृहे असतात. ती वेळोवेळी स्वच्छ ठेवणं, त्यांत व्यवस्थित पाणी पुरवठा करणं व दिवाबत्तीची सोय करणं, कडी कोयंडे तपासून दुरुस्त करून घेणं, अशा अनेक गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं; पण या महत्त्वाच्या कामात बऱ्याच वेळा निष्काळजीपणा आढळून येतो. त्यामुळे डब्यात शिरताना दाराजवळच येणारी तसंच प्लॅटफॉर्मवर येणारी दुर्गंधी […]

मालगाडीचे डबे (वाघिणी)

‘मालगाडी वाहतूक’ हे रेल्वेचं सर्वांत जास्त उत्पन्न असलेलं खातं आहे. सामानाच्या गरजेनुसार मालगाडीचे डबे तयार करणं हे महाजिकरीचं काम असतं. डबे बनवल्यानंतर प्रत्येक विभागाचे डबे एकाच मालगाडीला जोडले जातात व काही महिन्यानंतर त्यांची तांत्रिक क्षमता उत्तम साधण्यासाठी ते डबे पुन्हा आपापल्या विभागाकडे पाठविले जातात. मालगाडीचे डबे खालील गोष्टी वाहून नेत असतात: धान्याची पोती मिठागरातील मीठ लाकूड, […]

रेल्वेचे प्रवासी डबे

ज्या रेल्वेनं आपण प्रवास करणार, त्या गाडीचा प्रवासी डबा हा प्रवाशांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. आज सुखसोयींनी युक्त डबे सर्वत्र उपलब्ध आहेत, पण सुरुवातीच्या काळातले रेल्वेचे डबे फारसे आरामदायी नव्हते. अगदी इंग्लंडमध्येदेखील सुरुवातीला रेल्वेचा प्रवास अतिशय खडतर असाच होता. थंड हवामान, लवकर पडणारा अंधार, त्यांतच डब्यातील सोयी अगदीच जुजबी होत्या. थंडीने प्रवासी गारठून जात. काही […]

रेल्वे ट्रॅक (लोखंडी सडक)

रेल्वेची चाकं व्यवस्थितपणे, विनासायास फिरत जातील अशा ‘दोन समांतर रेषेत असलेल्या; कठीण, तरीही गुळगुळीत अशा; सलग व लांबच लांब लोखंडी पट्टया’ म्हणजे रेल्वेचा ‘ट्रॅक.’ तो व्यवस्थित व सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक धोकादायक अडचणींवर मात करावी लागते आणि तो बनविण्यासाठी कल्पनेबाहेर खर्च येतो. आजच्या जमान्यात रेल्वेची बांधणी ही बाब अतिशय सहजपणे गृहीत धरली जाते, त्यामुळे त्याकडे आवर्जून फारसं […]

लेव्हल क्रॉसिंग गेटस (रेल्वे फाटक)

भारतीय रेल्वेचं जाळं हे शहरं, गावं, खेडी यांना छेदत जातं. रेल्वेमार्गांच्या दुतर्फा वसाहती असतात. या वसाहतींतील रहिवाशांना दोन्ही बाजूंनी जाता-येताना रेल्वेमार्ग ओलांडावाच लागतो. भारतात अशा लेव्हल क्रॉसिंगच्या ३२,६९४ जागा असून, त्यांतील १७,८४१ ठिकाणी रेल्वेचा कर्मचारी २४ तास हजर राहून राखण करतो; परंतु १४,८५३ क्रॉसिंगच्या जागांवर कोणीही कर्मचारी नेमलेला नसल्यामुळे मार्ग असे नेहमीच सर्वांसाठी खुले असतात. जिथे […]

केबिन सिग्नलतंत्रज्ञ

सिग्नल व्यवस्था अखंड सुरळीत ठेवण्याचं काम केबीन सिग्नलतंत्रज्ञ करतात. रेल्वेचे रुळ, त्यांतील सांधे खेचण्याचा हलणारा दांडा, बॉक्स, विद्युतप्रवाह या सर्वांचा समन्वय झाला, की सिग्नल लागतो. मध्ये एखादा छोटासा खडा जरी आला, तरी यंत्रणा बिघडते. हा बिघाड तत्परतेने शोधणारे रेल्वे कर्मचारी केबिनमध्ये सतत सतर्क असतात. प्रत्येक केबिनची कामाची हद्द २२ कि.मी. किंवा त्याहून जास्त किलोमीटर एवढी असते. […]

रेल्वेसिग्नल्स

रेल्वेप्रवास विनाअपघात सुरू राहण्यात सिग्नलची व्यवस्था अपरिहार्य असते. जेव्हा इ.स. १८०६ च्या सुमारास दगडीखाणी असलेल्या जागांजवळ घोडे व गाढवे यांच्याद्वारा ओढून नेल्या जाणाऱ्या मालगाड्या प्रथम वापरण्यास सुरुवात झाली, तेव्हा रखवालदार रेल्वेलाईनवर उभं राहून हातानं सिग्नल दाखवीत. अशा वेळी काळोखामध्ये मिणमिणत्या कंदिलांचा उपयोग केला जात असे. जगातील पहिली इंजिन लावलेली प्रवासी गाडी डार्लिंग्टन ते स्टॉकटोन या अंतरात […]

विद्युतीकरण

रेल्वेवाहतूक सुरळीत, सुरक्षित आणि जलद अशी अखंडपणे सुरू राहण्यासाठी रेल्वेमधले कर्मचारी व तंत्रज्ञ हे जसे महत्त्वाचे दुवे असतात, अगदी त्याच तोलामोलाचं महत्त्व रेल्वेमधल्या आधुनिकीकरणालाही आहे. काळ बदलला, रेल्वेप्रवाशांची गर्दी वाढली, रेल्वेचा विस्तार वाढला, तसं दर टप्प्यावर रेल्वेनं बदलांना, नव्या तंत्रांना आपलंसं केलं. या प्रवाहात रेल्वेला खऱ्या अर्थानं वेग आणण्यात विद्युतीकरण हा भाग अत्यंत महत्त्वाचा ठरला. विजेवर […]

1 2 3
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..