नवीन लेखन...

रेल्वेमधील खानपान व्यवस्था (पँट्री कार)

१८९० ते १९१० च्या दरम्यान चोवीस तास वा त्यापेक्षा जास्त वेळ प्रवास करण्यासाठीच्या लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू झाल्या. त्यावेळी प्रवासात जेवणाची, खाण्यापिण्याची सोय प्रवासी स्वत:च करत असत. चार ते पाच-कप्पी पितळी वा अॅल्युमिनियम डबे, फिरकीचे तांबे, खुजे अशा जय्यत तयारीनिशी प्रवासी मंडळी दूरच्या प्रवासास निघत. ब्रिटिश उच्च अधिकारी पहिल्या वर्गानं प्रवास करत. त्यांना ताजं जेवण लागत […]

रेल्वे प्लॅटफॉर्मवरील निराधार मुलं

भारतातील बऱ्याच मुख्य स्टेशनांच्या अगदी एका टोकाला एखादा प्लॅटफॉर्म किंवा यार्डाची एखादी दुर्लक्षित बाजू अशी असते, जिथे रेल्वे डब्यांचा फारसा वावर नसतो; परंतु अशा जागी एखादा जुना मोडकळीस आलेला डबा कायमचा रुळांवर असतो. ५ ते २० वर्षे वयोगटातील अनेक मुलं-मुली या डब्यालाच आपलं घर मानून तिथे मुक्काम ठोकतात. यांतील बऱ्याच मुलांना घरातून हाकलून दिलेलं असतं. काही वेळा घरच्या जाचाला कंटाळून नाइलाजानं काही जण रेल्वे प्लॅटफॉर्मचा आश्रय घेतात. […]

लाल डगलेवाला रेल्वेहमाल

स्टेशनवर शिरतानाच प्रवाशांना जी पहिली व्यक्ती भेटते ती म्हणजे लाल शर्ट व त्यावर पितळी बिल्ला असलेला हमाल. त्यांचं दुसरं नाव आहे ‘कुली’; परंतु ते नाव त्यांना आवडत नाही म्हणून त्यांच्या संस्थेनं हमालांना ‘पोर्टर’ ते म्हणावं अशी सातत्यानं मागणी केलेली आहे. ‘कुली’ या शब्दाचा हिंदीतील अर्थ ‘दिवसभर काबाडकष्ट करणारा कामकरी’ असा आहे. गुजरातमध्ये त्या नावाने एक जमात […]

रेल्वेमधील फेरीवाले

अपरिहार्यपणे रेल्वेचाच भाग असल्यासारखे वावरणारे रेल्वेतील फेरीवाले म्हणजे संपूर्ण समाजातील विविध गटांच्या सामुदायिकत्वाचा आरसाच असतो. त्यांत तरुण, मुलं, मुली, बायका, लहान मुलं, म्हातारे, इतकंच नव्हे, तर तुणतुणं वाजवून गाणी म्हणणारे अंधजन हे सर्व जण सामावलेले आहेत. ते सारे आपापल्या परीने हुशार व रेल्वेच्या वातावरणाशी अगदी मिसळून गेलेले असतात. संपूर्णत: बेकायदेशीर असलेल्या या विक्रेत्यांकडे एम.बी.ए.ची पदवी नाही, […]

रेल्वे आणि मुंबईचा डबेवाला

रेल्वेचा पगार घेणारे रेल्वेचे कर्मचारी हा जितक्या सहजतेनं कुतूहलाचा विषय होतो, तेवढ्याच सहजपणे रेल्वेशी अतूटपणे बांधले गेलेले मुंबई शहराचे डबेवाले, रेल्वेतले फेरीवाले, लाल डगलेवाले हमाल, प्लॅटफॉर्मवरची निराधार मुलंमुली यांच्या आणि रेल्वेच्या नात्याबद्दलही कमालीची उत्सुकता वाटते. या लोकांचं जगं, त्यांचे व्यवसाय रेल्वे’शिवाय अगदी कोलमडून पडतील असे असतात आणि म्हणून वेगळ्या अर्थाने ही मंडळी रेल्वेची मंडळी’ असतात. यापैकी […]

रेल्वे-कर्मचारी

भारत सरकारच्या आधिपत्याखाली असलेल्या सरकारी खात्यांमध्ये सर्वांत जास्त कर्मचारी वर्ग हा रेल्वेखात्यात नोकरी करतो. त्यांची संख्या अंदाजे १४ लाखांपर्यंत आहे. साधारणपणे दर ४५० ते ५०० भारतीयांमध्ये एक व्यक्ती ही रेल्वेशी संलग्न असते. हा आकडा ज्यांना रेल्वेकडून पगार मिळतो त्यांचा आहे, रेल्वेशी जोडल्या गेलेल्या अनेक कंपन्या, बांधकामांवरील कर्मचारी, हे यांहून निराळेच असतात. स्टेशनवरील अनेक जोडधंद्यात असलेली मंडळी […]

तिकीट तपासनीस (तिकीट चेकर)

रेल्वेमधला तिकीट तपासणीस अर्थात टी.सी. हा एक स्वतंत्र विषयाचा मामला आहे. या टी.सी.नावाच्या व्यक्तीबद्दल प्रवाशांच्या मनात नेहमीच थोडीशी भीती असते आणि आतून सुप्त राग खदखदत असतो. ‘प्रसंगी दंडाची रक्कम यांच्या हातांत पैसे दाबून टाळता येते’, ‘ते लाचखाऊ असतात’ असाही एक अपसमज जनसामान्यांमध्ये ठसलेला असतो. प्रवाशांवर वचक ठेवणारे आणि स्वत:विषयीचे समज-गैरसमज सोबत घेऊन काम करणारे हे टी.सी. […]

रेल्वे गँगमन अर्थात रेल्वे ट्रॅकमन

हजारो किलोमीटर पसरलेल्या रेल्वेमार्गांची कसोशीनं देखभाल करणारे शेकडो कामगार म्हणजे रेल्वे गँगमन.’ ‘गँग’ ह्या शब्दाबरोबर डोळ्यांसमोर गुंडांची गँग उभी राहते, त्यामुळे या शब्दाला या कामगारांनी नापसंती दर्शवली; म्हणून त्यांना आता ‘ट्रॅकमन’ व ‘खलाशी’ म्हणतात. हे कामगार रेल्वेमार्गांना जिवापाड जपतात. रेल्वेमार्गांची सुव्यवस्था ठेवणं, डोळ्यांत तेल घालून फिशप्लेट्सवर सतत लक्ष ठेवणं ही ट्रॅकमनची जबाबदारी असते. खरंतर ते रेल्वेचे […]

उद्घोषक (अनाउन्सर)

प्रत्येक यंत्रणेत अनेक पातळ्यांवरचं व्यवस्थापन सांभाळणं हा मोठा कौशल्याचा आणि तंत्रशुद्धतेचा भाग असतो आणि रेल्वेबाबत तर, देशभर ठरलेल्या वेळेत, ठरलेल्या मार्गांवर रेल्वे धावती असणं आणि कोणती गाडी कोणत्या स्टेशनामध्ये किती वाजता येते आहे, जाते आहे हे प्रवाशांना माहीत असणं, असा प्रवाशांप्रतीच्या व्यवस्थापनाचा दुहेरी भाग ठरतो. आज प्रवाशांपर्यंत गाडीची माहिती पोहोचवण्याचं काम उद्घोषक करतात, पण रेल्वेच्या सुरुवातीच्या […]

रेल्वेयार्ड व तेथील कर्मचारी

लांब पल्ल्याची गाडी अखेरच्या स्टेशनात म्हणजे मुख्य स्टेशनात आल्यानंतर तपासणीसाठी व इतर छोट्या-मोठ्या दुरुस्तीसाठी ज्या ठिकाणी नेतात ते ठिकाण म्हणजे ‘यार्ड’. यार्डात प्रत्येक डब्याची कसोशीनं तपासणी होते, स्वच्छता होते व ती गाडी परत परतीच्या प्रवासासाठी सज्ज होते. या सर्व कामासाठी अनेक कर्मचारी फार कठीण परिस्थितीत यार्डात काम करीत असतात. उदाहरणार्थ, मुंबईतील माझगाव रेल्वेयार्डाच्या प्रसिद्ध झालेल्या समस्यांकडे […]

1 2 3
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..