रेल्वे बांधणीचा परामर्श
जिद्द, नियोजन, सर्व पातळ्यांवरची तत्परता, दर्जाबाबत तडजोडीला संपूर्ण फाटा, असा तोल साधत, १८५३ सालात सुरू झालेल्या भारतीय रेल्वेनं पहिल्या, पंचवीस वर्षांत ६,५४१ मैल मार्ग पूर्ण केले. त्यानंतरच्या पंचवीस वर्षांत, म्हणजे रेल्वेबांधणीला पन्नास वर्षं होता होता २३,६२७ मैल रेल्वेमार्ग पूर्ण करत ही संख्या जवळपास चौपटीच्या आसपास आणून ठेवली. रेल्वेला ६० वर्षं होता होता, १९१३ च्या सुमाराला व्हिक्टोरिया […]