मी मदत करू ? (लघुकथा)
कवटी फुटल्याचा आवाज झाला. रात्र गारठत होती. सगळी मंडळी आपापली बूड झटकत त्या मसणवट्यातून उठून घराकडे निघाली. त्याला झाडाआडून दिसत होते. चितेच्या लाकडांनी चांगलाच पेट घेतला होता. सर्वत्र सामसूम झाल्याची खात्री करून, तो अंधारातून बाहेर आला. चितेजवळ जाऊन बसला. त्या लाल ज्वाळांचा प्रकाश त्याच्या चेहऱ्यावर उष्ण हवेचे झोत मारत होता. क्षणभर त्याला त्या उष्ण लहरी काहीतरी सांगताहेत असे […]