लघु कथा
भयानक स्वप्न !
रात्रीचे किती वाजलेत माहित नाही. पण सर्वत्र निजानीज झाली होती. रात्रीची भयाण शांतता आणि गारवा जाणवत होता. मी अंधारातच अंथरुणावर पडल्या पडल्या डोळे किलकिले करून पहिले आणि कोनोसा घेतला. मधेच जाग कशाने आली? लक्षात येत नव्हते. कसलीतरी खाडखूड ऐकू आली. बहुदा अशाच आवाजाने झोपमोड झाली असावी. पुन्हा तोच खड्खुडीचा आवाज. […]
हे सार थांबवा ! प्लीज !!
ती, एक नखशिखान्त पांढऱ्या रंगात रंगवलेली, सरकारी दवाखान्याच्या तळघरातील खोली होती. फार तर दहा बाय बाराची. त्यात त्या कॉटने,ज्यावर मला आता त्या नर्सने बांधले तो,निम्या पेक्षा ज्यास्त जागा व्यापली होती. त्या खोलीला एकही खिडकी किंवा झरोका नव्हता. फक्त भिंतीशी एकरूप झालेला एक दरवाजा होता. तो ही पांढरा फटक! […]
थ्रिल !
‘कर्ता करविता परमेश्वर आहे !’ या तत्वावर दृढ विश्वास असणारा मी माणूस आहे. माझ्या मनात जी भावना उत्त्पन्न होते ‘ती ‘हि तोच करतो.मग त्याच्या कृतीची संकल्पना आणि अंमलबजावणी योजना माझ्या मेंदूत तयार होते.अशा प्रकारे ती माझ्या कृतीत उतरते. सर्वांच्या बाबतीत अशीच प्रक्रिया असावी. फक्त त्याचे श्रेय मी देवाला देतो ,आणि इतरजण ‘मी केले!’ किवा ‘मी करून दाखवले का नाही ?’म्हणून आपलाच ढोल बडवून घेतात! […]
स्वयपाकिण कोठे मिळेल ? वेताळ कथा
नाना झिपऱ्या हेकटच. त्याने पुन्हा खांद्यावर प्रेत घेतले. आणि तो स्मशानाची वाट चालू लागला. चार सहा पावले नसतील टाकून तोच नानाच्या नाकाला उंची डिओचा वास आला. लोगोलाग वेताळाने प्रेतात प्रवेश करून संभाषण चालू केले. “बँकेच्या कर्जांवरी व्याजा प्रमाणे तुझा हेकटपणा वया बरोबर चक्रवाढ दराने वाढत चाललाय. तू स्वतः बरोबर मला पण त्रास देतोयस. माझे काय जातंय […]
पासिंग मुंबई !
इन्स्पेक्टर राघवचे अंडरवर्डचे नेटवर्क जबरदस्त होते.गुप्तहेर संघटनेचा सिक्रेट मेसेज आलेच होता. काहीतरी गडबड होणार याची त्याला जाणीव होती. ड्रग्स ,सोने किवा हत्यारे मुंबई पास करण्याची शक्यता होती. हल्ली कल्पनाही करता येणार नाही अशे रुट्स हे स्मगलर्स वापरत आहेत. राघवने आपल्या इंफोर्मेर्सना ‘लक्ष’ठेवण्यास वार्न केले होते. […]
प्रोजेक्ट – ‘मय्यत’ !
हि माझी कथा -विदूषक १९९९च्या दिवाळी अंकात सु र आळंदकर या नावाने ‘भोवनीच मयत ‘ या शीर्षका खाली लिहली होती. […]
सुखी माणसाचा सदरा हवाय ?
पहाणाऱ्या साठी मी एक सुखी माणूस आहे . वयाच्या पासष्टीत हि उत्तम प्रकृती . सुंदर पत्नी ,हो अजूनही म्हणजे वयाच्या साठीत सुद्धा जान्हवीने स्वतःस सुरेख मेनटेन केलाय . मुलगी आणि जावाई दोघे डॉक्टर , ग्रीन कार्ड मिळालेले न्यू जर्सीत वेल सेटल्ड . मुलगा – सून बेन्ग्लोरला , आयटी क्षेत्रात . आम्ही दोघे पुण्यात . राहायला छोटेसेच […]
वश्याच ‘ क्युट ‘ लफड
नेहमी प्रमाणे मी मुडक्याच्या टपरीवर चहाचे घुटके घेत होतो . शाम्या आपला ‘खारीचा ‘ वाटा सम्पवत होता . आत्ता पर्यंत त्याच्या खारीनी दोन कप चहा पिवून टाकला होता . तिसऱ्या कपात शाम्या शेवटची खारी मोठ्या तन्मयतेने बुडवत होता . “सुरश्या ,तुमच्या चहाचे बिल माझ्या कडे !मुडक्या मला कॉफी आण !” जमिनीत मुंडी खुपसलेल्या शहमृगा सारखा, मोबाईल […]