नवीन लेखन...

जगा लेकोहो

आज थोडी भाकरं अन कोरड्यास खरडा सुगीवाचून कसं मिळंल खायाला खमंग हुरडा उद्याचे दान काय उद्याच्याला सोडा आज कशापायी ओढता उगा गाडा इतभर खळगी भरून कशाला हाती घेता गाडगा झोपाया थोडी लागलं चारखणी वाडा चारखणी वाड्यातबी निस्ता आरड ओरडा कुठं कुणा सुख टोचे ईर्षा आणि पाय निसरडा उगा खेचू नाही वाईच तुमी हेका सोडा समजून उमजून […]

माझे जीवन गाणे

आपल्या अतिशय अतिशय व्यस्त कामातूनही वेळ काढून मोठ्याने बरं का कानांत कोंबून नाही आपल्या आवडीची गाणी नक्की ऐका… ऐकवा ! अशीच ऐकून ऐकून नंतर ती अचानक आठवतात… आणि आपल्याला त्यांच्या आठवणीत रमवतात! […]

सख्या

एक रस्ता हवा सख्या तुझ्या हाती हात गुंफून अव्याहतपणे तुला शोषत राहण्यासाठी तहानलेला भ्रमर जणू मी, तू एक मस्तवाल मोठ्ठालं फुल दिमाखदार नि साजर, थोडस बुजरं एक अथांग क्षितिज हवं सख्या अधीर अनुरक्त होऊन कवेत सामावण्यासाठी तू एक खगेंद्र, उंचच उंच झेप घेऊन एकटाच मत्त दूरवर काही शोधणारा एक थिजलेला काळ हवा सख्या मनाच्या द्वंदातील अनंत […]

येरझार

सोसे दुख सांगू न्हाई झाडापरी व्हावं मुकं दयाव घ्यावं वला शबूद ऐकू न्हाई कदी कौतुक जगू दे रे मनाठायी फळं फुलं ओलं सुकं पडे पदरात जे काही मान हेच सार सुख साचून का डबके होई दे कि सोडुन सारं खळखळ वाहे सरितामाई फुलवं अंगातील वावरं मुखी वाणी कशापायी इचार करिशी थांबून वाया नगं रं आटापिटा कर्म […]

इंद्रवज्र

रंग खरा काय माझा ठाव मजला नाही एकचं रंग अंगी लेणे हे मला मंजूर नाही रंग काय कातडीचा हे कुणा ठाऊक नाही नका पारखू त्याने माणसा तो माझा अंतरंग नाही छटा अनंत काळजाला इंद्रवज्र व्यापून राही दे धीराने वेळ थोडा कुंचल्यात आहे काही हा असा नि तो तसा जन्मण्या ना जात काही असतेच कुठे नाव त्या […]

धग

धरणी तापली कोपली कष्टानं रापली काया लाज ठिगळात लपली न्हाई जरीची कि माया बाईचं जिणं एकली न्हाई सोबती सहाया वेणा तिलाच सोसली न्हाई गड्यास कळाया घामघामानी नटली उभी चिंब देह न्हाया किती उगाळू राहिली तिचा चंदन झिजाया चुलीत धुनी पेटली घातला जलम शिजाया चटके बसून शोधली भाकर हाय का खळगीला आता सरली सरली म्हणू आलीस उरकाया […]

कोडगे लाचारसे

कोडगे लाचारसे मन विव्हळ हतबल आहे दिसे सभोवार धूसर अंधुक जगणे रुष्क कोरडे आहे मिळो पुन्हा जन्म जिथे हौसेला मोल आहे पापण्यांतील मोत्याला झेले जो हळुवार बोल आहे बैरागी भैरवी गाते विराणी कविता वाहे मुक्त आसवं ढाळत संध्याकाळ निमाली आहे साऱ्याला अंत आहे कष्टांना का मग नाही रोज नवे दुःख दुखणे वाट्यास वाढले आहे दयाघना तुज […]

वणवा

आताच दिस आला लगा मिटला मिटला कसं राहू कसं सहु जीव विटला विटला किती राबू घाम काढू सोलवटू या अंगाला परी दिसना कुठंचं एक सबूद ही ओला पेरू काय अन कुठं ओलं नाही ढेकळाला सारं कातळ कातळ पाझर नाही रं मुळाला वणव्यात लाही लाही नाही जाळं शरीराला करपून काळीज ह्ये गेलं मातीला मातीला असे सरतील दिस […]

एक अजून साल

घालून पोतडीत काळ उगा धावतो आहे किती राहिली किती गेली याचा हिशेब मांडतो आहे एक सोनेरी आशा उद्या म्हणून वेडा जीव सुखावतो आहे उद्या कधीही येत नसतो आज हाच रोज उगवतो आहे एकेक क्षण प्रत्येकाच्या सुखदुःखाचा सोबतीनं वाहतो आहे हो प्रवाही सरितेसारखा डबक्यात बेडके चिकार आहेत एकेक दिस असा जगून घे जसा आज हाच अंत आहे […]

बाईपण

अडखळू नकोस सखे बोल जे आहे मनात नको संकोच होउदे संवाद का घुसमटून श्वास कोंडतात? नकोसे म्हणावे नको हवे तेचं घ्यावे पदरात मोह होता, कर स्वीकार उत्सव होउदे रोजच्या जगण्यात आकसू नको तू बाईपणाने ताठ माने चाल जनात सुसाट सुटुदे भात्यातील तीर कर्तृत्वाने उजळू दे स्वत्व येणाजाणारा टोचरा धक्का बसू नको तू आता सहत विरोध कर […]

1 2 3 4 8
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..