वर्षा कदम
तू
कधी तू तळपत्या तलवारीची तीक्ष्ण धार कधी तू मृदू आणि कोमल बहावा अलवार कधी तू वज्राहून कठीण माळावरचा कातळ कधी तू बेफाम फुललेला गर्दगुलाबी कमळ कधी तू मर्द मराठी गडी रांगडा कधी तू न सांगता समजणारा मनकवडा कधी तू रुक्ष नि बोचरा निवडुंग कधी तू वेडावणारा चाफ्याचा सुगंध कधी तू तांडवाचा रुद्र अंगार कधी तू बेधुंद […]
पाऊस येतो
आला तोच सुगंध ज्याचा आठ मास विसर पडतो, आला तोच मातीच्या गंधाचा अत्तर जीव वेडावून भान हरपतो, आला तोच सोहळा ज्याचा सृष्टीला परमानंद होतो, भिजवून धरतीला आकंठ चराचरातून निर्मळ करतो, आला पाऊस तोच पुन्हा जो दरसाली नित्यनेमाने येतो, तरीही नेहमी नव्या जुन्या आठवणींचा पूर पुन्हा वाहून आणतो, आला शहारा तोच तेव्हाचा डोळे अलगद मिटून घेतो, तू […]
आयुष्याच्या संध्याकाळी
आयुष्याच्या संध्याकाळी संपते जीवाची ही वात गात्र कुरकुरू लागली मन भरून सारखं तुला पाहू वाटतं थरथरे माझे हात घेण्या तुझा हात हाती एक जीव एक प्राण तुझ्या माझ्या संसाराची जन्मभर साथ दिली आता सोडून चालले एकला समजू नको तुला पाहतील हे डोळे तो येईलचं आता काळाच्या कुशीत न्यायला जरा विसावते आता मग जमेल जरा जायला जाईन […]
मेघमल्हार
पावसाच्या थेंबांचा एक वेगळाच रव असतो, एक ताल, एक नाद असतो एक अवीट गाण्याचा बोल असतो कि ऐकणाऱ्या कानांचा खेळ असतो पावसाच्या येण्याचा काहीं नेम नसतो कधी येईल कधी जाईल, त्याचा तो मुक्त असतो भरून आलेल्या आभाळाला न पेलणारा भार असतो तप्त झालेल्या मनाला दिलासा देण्यागत गार भासतो पाऊस येण्याचा स्वतःचा एक बाज असतो कोसळत धोधो […]
जळणं
ज्याचं त्याने ठरवावं आपलं आपण कसं जळाव धडधडत्या चीतेतली उद्धवस्त करणारा अग्नी व्हावं कि क्रांतीतल्या पेटत्या मशालीची ज्योत व्हावं कि व्हावं स्वार त्या वनव्यावर जे सगळं जंगल जाळून जात ज्याचं त्याने ठरवावं आपलं आपण कसं जळाव उब देणारी शेकोटीतली तापलेली आग व्हावं कि तप्त पोटातल्या अग्नीला विझवणारी चुलीतली राख व्हावं कि स्वतः सहित जळणाऱ्या समईतली प्रकाशीत […]
प्रियकराची साद
मन भुंगा साद घाली येऊ का रे माझ्या फुला झुलवेन तुजला मी करून हातांचा झुला सरले बघ ऋतू कसे बहरत गात वसंत आला शृंगारत तुही बैस ऐसे जणू तू एक धुंद प्याला तुझी लाज अन संकोच थोडा सारे काहीं जाणवते गं मजला पण सोड सखे आता हा बेडा जोडीनं फुलवू बघ बाग आगळा तुझ्या प्रीतीच्या जोडीनं […]
दिवा
दिव्याची ही ज्योत , सांजवेळी साथ स्वतःला जाळूनही उजळते ती वात, दिव्याची दिवे लागणी अन दिव्याची ही रात सारीकडे सारा उजेड, तिमिरास जागा नाही आत लक्ष दिवे उजळलेत, लक्ष अजूनही प्रतीक्षेत उद्या उगवेल म्हणून कुणी अजूनही बसलेय आशेत तेल जाते जळून नि दिवा होतो शांत, उद्या पुन्हा जळण्यासाठी वाट पाहते ती वात .. — वर्षा कदम.
रात्र
रात्र वाढत चाललीय हळूहळू बाहेरचे आवाज एकेक कमी होतील काही कर्कश्श, काही गुणगुणते, काही सवयीचे, मग वाढतील आवाज किर्रर्र रातकिड्यांचे लांब कुठेतरी घुमणाऱ्या घूत्काराचे हळूहळू सगळे बाहेरचे आवाज थांबतील… निशब्द मग सुरु होतील आतले मनाचे आवाज, त्याचे दबके शब्द दिवसाच्या कोलाहलात गर्दीत विरलेले गुदमरून आत आत कोंडलेले, सारे काहीं वाहत जाते विचारांची एकच झुंबड गर्दी होते […]
आजची आई
संस्कार, संस्कार कधी करू बाई दिवस नि रात्र, आम्हां रोजचीच घाई सकाळ संध्याकाळ चाले काट्यावर बाई मनातली ममता कोंडून घेते आई घरी सोडून जाताना, जीव तुटतोच गं बाई कामावर असतो फक्त देह, मन कधीच घरट्यात उडून जाई छोट्याशा पिलापाशी हळूच गिरकी घेऊन येई कातरवेळी परतीची वाट खूप दूरची होई पिलाच्या आठवणीत जीव कासावीस होई घरी येऊन […]