फुलता पारिजात
सांगू कशी वाऱ्याला थांबव तुझे आघात गारवा फार सुखावे झोम्बे नुसता झंझावात सांगू कशी रजनीला उतरू नकोस चांदण्यात सारे शीतल वाटे मन फुलता पारिजात सांगू कशी धरतीला न्हाऊ नकोस पावसात मृदगंध अत्तर कोठे सापडेल या जगतात सांगू कशी मनाला झुलू नकोस आनंदात सारे घडे मनाजोगे संपेलच विरहाची रात्र!! — वर्षा कदम.