त्रिमितीय जीवाश्म
पृथ्वीवरच्या वृक्षांचं स्वरूप उक्रांतीद्वारे सतत बदलत आलं आहे. आज आपल्या अवतीभोवती अनेक जाती-प्रजातींचे मोठमोठे वृक्ष आढळतात. मात्र एकेकाळी पृथ्वीवर फक्त शेवाळासारख्या किंवा नेच्यांसारख्या दिसणाऱ्या, छोट्या अपुष्प वनस्पती अस्तित्वात होत्या. या वनस्पतींना वृक्षासारखं स्वरूप सुमारे अडतीस कोटी वर्षांपूर्वी प्राप्त झालं. या वृक्षांचं स्वरूप आजच्या वृक्षांपेक्षा खूपच वेगळं होतं. […]