वाढता लखलखाट
रॉबर्ट होल्झवर्थ आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या विश्लेषणानुसार, २०१० सालच्या जून, जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यांत पृथ्वीवर लखलखणाऱ्या दर हजार विजांमागे दोन विजा आर्क्टिक प्रदेशात नोंदल्या जात होत्या. मात्र, २०२० साली हाच आकडा दर हजारी सहापर्यंत वर गेला आहे. वाढत्या तापमानामुळे आर्क्टिक प्रदेशातही हवेचे प्रवाह आता काहीसे सहजपणे वर जाऊ लागले आहेत. याचा परिणाम विजांची संख्या वाढण्यात होत आहे. […]