नवीन लेखन...

छत्रपती संभाजी महाराजांचे इंग्रज, सिद्धी आणि पोर्तुगीज यांच्याशी संबंध

छत्रपती संभाजी महाराजांनी अवघ्या नऊ वर्षांच्या कारकिर्दीमध्ये पोर्तृगीजांशी असा लढा दिला की पोर्तृगीजांची यापूर्वी कधीही फजिती झाली नव्हती अशी फजिती झाली. अवघ्या 32 वर्षांच्या वादळी आयुष्यात त्यांनी अनेक विजय संपादन केले. एकूण 120 मोहिमांचे त्यांनी नेतृत्व केले. तरीही छत्रपती संभाजी महाराजांनी एकदाही हार पत्करली नाही. […]

समृद्ध शेती, श्रीमंत शेतकरी काल, आज आणि उद्या

शेती आणि शेतकरी देशातील सर्वात महत्त्वाचा घटक जो आपणास कधीही उपाशी ठेवत नाही मित्रहो आज आपण भारतीय शेतीचा इतिहास सुरुवात नवनिर्मिती तंत्रज्ञान प्रगती संशोधन उद्योग व्यवसाय निर्यात पर्यटन आणि बरेच काही  या लेखातून आपण चर्चा करूया. […]

उपलब्ध पाणी हे कोकण विकासाला सहाय्यक ठरू शकेल काय?

आपल्याजवळ काय नाही याची चिंता करत बसण्यापेक्षा आपल्याजवळ काय आहे, त्याचा आपण आपल्या विकासाठी कसा वापर करू शकतो हे उचित ठरणार नाही का? एक पर्यटनस्थळ निर्माण करणे म्हणजे किमान 100 लोकांना रोजगार उपलब्ध करून देणे होय. हा झाला प्रत्यक्ष रोजगार. यापेक्षाही अप्रत्यक्ष रोजगार तर अमाप असतो. […]

कोकण समुद्र : त्यातील जीव आणि वनस्पती वैभव

समुद्राचं जग समजून घेण्यासाठीच आपल्याला त्याच्या अधिवासांची ओळख करून घ्यायला हवी. समुद्राचं जग सुरू होतं वाळूच्या किनाऱ्यापासून!  वालुकामय, चिखलयुक्त  किंवा खडकाळ किनारे, किनाऱ्यांवरील खारफुटीची जंगले, खाड्या आणि प्रवाळांचे क्षेत्र हे या सागरी जगाचे महत्त्वाचे भाग. त्या-त्या प्रदेशानुसार इथली जैवविविधता बदलते आणि त्यामुळेच कोकण किनारपट्टी ही समृद्ध बनते. […]

कोकणातील सागरी मासेमारी

महाराष्ट्र राज्याला विशेषतः कोकणामध्ये खारे, गोडे आणि निमखारे पाणी असे तिन्ही प्रकारचे नैसर्गिक जलस्रोत उपलब्ध आहेत. या उपलब्ध असलेल्या नैसर्गिक जलस्रोतांच्या सुयोग्य नियोजनाद्वारे मत्स्य उत्पादन वाढवून नीलक्रांती घडविणे ही काळाजी गरज आहे. देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासात मत्स्य व्यवसायाचा महत्त्वाचा वाटा आहे. कोकणामध्ये सागरी मासेमारी व्यवसायामुळे  आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गातील लोकांकरिता स्वस्त व पोषक अन्न उपलब्ध होते. त्याचबरोबर रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतात. या अनुषंगाने या लेखामध्ये कोकणातील सागरी मासेमारी या विषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया. […]

कोकणातील बागायती फळ शेती

आम्हाला विकास हवा आहे, पण त्यासाठी मेहनत, पुढाकार, चिकाटी, सहनशीलता या गोष्टीची सुद्धा गरज असते. पण त्या बाबतीत कोकणातला माणूस थोडा कमी पडताना दिसतो. सद्यस्थिती  पाहिल्यास या समूहातील काही उद्योजकांनी काजू प्रक्रिया उद्योगात खूप मोठी भरारी घेतली आहे. यातील काही उद्योजक 2003 साली दिवसाला चाळीस ते पन्नास किलोच्या आसपास काजू बी वर प्रक्रिया करत होते. सद्यस्थिती ते दिवसाला अडीच ते तीन टन काजू बी वर प्रक्रिया करत आहेत. […]

सर्वंकष संदर्भमूल्य ग्रंथ दर्शनिका (गॅझेटिअर)

महाराष्ट्र राज्यातील कोकण विभाग म्हणजेच राज्यालाच नव्हे तर देशालाही स्वर्गीय अनुभव देणारा असा हा भाग आहे. या भागास जैव विविधतेसह विशाल सागर लाभलेला आहे. निसर्ग संपन्न असा या भूप्रदेशात कुणालाही वास्तव्य करण्याची व या निसर्गाच्या अलौकिक साक्षात्काराची अनुभूती घेण्याविषयी आकर्षण वाटावे. यादृष्टीने दर्शनिका (गॅझेटिअर) विभागाने या भागातील विविध जिल्ह्यांचे दर्शनिका (गॅझेटिअर) बनविण्याचे काम हाती घेतले आहे. […]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..