मराठी माध्यमातून एम.बी.बी.एस.!
मराठी ही केवळ व्यावहारिक भाषा असून चालणार नाही तर ती ज्ञानभाषाही झाली पाहिजे. त्यासाठी निरनिराळ्या विषयातील ज्ञान मराठीत उपलब्ध झाले पाहिजे. मराठीतून उच्च शिक्षण उपलब्ध झाल्यास समाजातील एका मोठ्या वर्गाला त्याचा खूप फायदा होऊ शकतो. किंबहुना समाजाच्या दृष्टीनेदेखील हे आवश्यक आहे कारण सध्याच वर सांगितल्याप्रमाणे शिक्षण आणि आरोग्यसेवा या चैनीच्या गोष्टी झालेल्या आहेत. याचा दुसरा फायदा म्हणजे मराठी शाळा बंद होण्याचे प्रमाणही कमी होऊ शकेल कारण प्रगतीच्या संधी मराठीतूनही उपलब्ध होतील.
[…]