श्री शिवभुजंग स्तोत्रम् – ४०
भुजंगप्रियाकल्प शंभो मयैवं भुजंगप्रयातेन वृत्तेन क्लृप्तम् | नरः स्तोत्रमेतत्पठित्वोरुभक्त्या सुपुत्रायुरारोग्यमैश्वर्यमेति ‖ ४० ‖ या नितांतसुंदर, महनीय अर्थपूर्ण श्री शिवभुजंग स्तोत्राचे समापन करताना आचार्य श्री म्हणतात, भुजंगप्रिय- हे भुजंग प्रिया ! अर्थात ज्यांनी गळ्यात, हातात भुजंग म्हणजे सर्प धारण केलेली आहे असे, अकल्प- या दृश्य विश्वाच्या विलयाला कल्प असे म्हणतात. भगवान शंकर त्यानंतरही अस्तित्वात आहेत त्यामुळे त्यांना […]